Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शनिवार वाड्यावर सलामी “युवोत्सवाच्या” जल्लोषाची !!

Date:

‘जुनी चौकट मोडू या ना…नव्या वाटा शोधू या ना’ हा सूर आहे सध्याच्या तरूणाईच्या जगण्याचा. अगदी छोट्या आनंददायी प्रसंगांपासून ते आयुष्यातील करिअरसारख्या मोठ्या यशाला गवसणी घालण्यापर्यंतचे प्रत्येक क्षण तरूणाई मनापासून साजरे करते. सरत्या वर्षाची पाने पलटताना नव्या अध्यायाचे पान उघडण्यातही तरूणाईमध्ये वेगळेच चैतन्य असते. नवं वर्ष हे फक्त कॅलेंडरचे पान बदलणे नव्हे, तर आयुष्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि नव्या दिशा…नवे आकाश कवेत घेण्याचा विचार म्हणून भिनावा यासाठी तरूणाईच्या मनातील नव्या वर्षाच्या स्वागताची कल्पनाही अशीच भन्नाट असते. याच सळसळत्या उत्साही तरूणाईसोबत झी युवा या खास तरूणाईच्या मनातील भावनांचे प्रतिबिंब असलेल्या चॅनलने पुणेकरांना पर्वणी दिली ती अस्सल मराठी बाणा  जपणाऱ्या नवीन वर्षाच्या स्वागताची … . बाजीराव पेशवे आणि मस्तानीच्या हळूवार नात्याच्या पाऊलखुणा असलेल्या पुण्यातील शनिवार वाड्याच्या प्रांगणात;  झी युवावरील कलाकार आणि मराठी इंडस्ट्रीच्या तारे तारकांनी झी युवाचा पहिला  ग्रँड कार्यक्रम  ” युवोत्सव ” गुरुवारी १५ डिसेंबरला सादर केला . या कार्यक्रमात गाणी, स्किट आणि डान्सच्या विविध परफॉर्मन्सचा प्रेक्षकांनी पुरेपूर आनंद घेतला .

 

आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर विनोदाची पेरणी करणाऱ्या स्किटमध्ये हसता हसता अंतर्मुख करण्याची वेगळीच ताकद असते. यासाठी छोट्या पडद्यावर स्टँडअप कॉमेडीचा स्टेज गाजवलेल्या विनोदवीरांनी आणि झी युवाच्या प्रसिद्ध कलाकारांनी, दारूशिवाय पार्टी , नवीन दिवसाचा शोध , कोणतीही गोष्ट सेलिब्रेट करण्याचा सध्याचा बदलता ट्रेंड,  सोशलमिडियावरच्या पोस्ट लाइक आणि कमेंटचा खेळ, नव्या सणांच्या मालिकेत हरवत चाललेले पारंपरिक उत्सवाचे महत्व, वेगवेगळे डे सेलिब्रेशन अश्या विषयांवरील कोपरखळ्या आणि चिमटे घेणारे स्किट सादर केले आणि हेच या शोची खासियत ठरली . विशाखा सुभेदार, शशिकांत केरकर, हेमांगी कवी आणि कृतिका देव ही विनोदाची चौकडीने  स्किटचा स्टेज गाजवलाच पण त्यांच्या बरोबर झी युवाच्या मालिकांमधील शशांक केतकर , मधुरा कुलकर्णी . मिताली मयेकर , शुभंकर तावडे , रसिका वेंगुर्लेकर, ओंकार राऊत,  विवेक सांगळे , सक्षम कुलकर्णी , ओमकार गोवर्धन , सिद्धी कारखानीस , केतकी पालव ,  अपूर्व रांजणेकर ,  स्नेहा चव्हाण  या सर्व कलाकारांनी केलेल्या जबरदस्त सादरीकरनाने  प्रेक्षकही त्यांच्या प्रेमात पडले.

 

समोर तरूणाई असताना नव्या वर्षाच्या स्वागतसोहळ्यात डान्ससाठी पाय थिरकणार नाहीत असं होऊच शकत नाही.  वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर , मानसी नाईक, ऋतुजा शिंदे, सुमेधा मुदगलकर, मृण्मयी गोडबोले या मराठी स्टार्सचा डान्सधमाका असा  काही  रंगला कि पुणेकरांनी अख्खा  शनिवार वाडा डोक्यावर घेतला . यामध्ये लोककलेचा बाज असलेल्या गोंधळनृत्यासह सैनिकांच्या वेशभूषेतील ‘मल्हारी, पिंगा फेटा हा हटके फॅशन शो आणि रँप वॉक, झोकून देणाऱ्या प्रेमात वेडं करणारे झिंगाट साँग, लावणीचं फ्यूजन, मेलडी साँग आणि डान्स शो टिपेला पोहोचवणारा ढोलताशाचा गजर आणि जोडीला मायकल जॅक्सन असे धमाल स्किट यामधून “युवोत्सव” पाहण्याचा रंग क्षणोक्षणी चढत गेला आणि त्यावर पुणेकर मनापासून थिरकलेही .  या सर्व धमाल मस्तीबरोबरच विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळीच शान आणली .

 

अभिनेता आणि लेखक प्रियदर्शन, स्टँड कॉमेडीचा बादशहा अशी ओळख असलेला शशिकांत केरकर, यांनी लोकांना  पोट दुखेपर्यंत हसवले .  छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचा तरूणाईचा चेहरा अमेय वाघ आणि सर्वांची लाडकी स्पृहा जोशी या दोघांनीही उत्कृष्ट असे सूत्र संचालन करत झी युवाच्या युवोत्सवाला  एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा  आणि मोस्ट रोमँटिक  असा अभिनेता स्वप्नील जोशी आणि तरुणाईची आजची  धकधक गर्ल प्राथर्ना बेहेरे यांच्या लाजवाब परफॉर्मन्सने या झी युवाच्या “युवोत्सव ” या नवं वर्षाच्या आगमनाच्या कार्यक्रमाची सांगता केली. ह्या कार्यक्रमाचे झी युवावर १ जानेवारीला प्रक्षेपण होईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

चमत्कार! तो प्रवासी भयावह विमान अपघातातून वाचला…

अ हमदाबाद-लंडन विमानाचा आज भीषण अपघात झाला आहे. सुमारे...

अहमदाबाद विमान अपघातामुळे काँग्रेसचे मतचोरी विरोधातील मशाल मोर्चे १५ जून पर्यंत स्थगित

गडचिरोली/मुंबई दि १२ जून २५नरेंद्र मोदी हे ११ वर्षापासून...

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त सदानंद मोरे यांच्या हस्ते सत्कार अन रक्तदान शिबीर संपन्न.

पुणे (दि.१२) -सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने...

जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ

पुणे, दि. १२ : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण...