फेब्रुवारी म्हणजे प्रेम आणि रोमान्सचा महिना आणि हा प्रेमाचा सोहळा झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसोबत साजरा
करणार आहे. ११ वर्षे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालेली झी टॉकिज हि वाहिनी आपल्या प्रेक्षकांचा व्हॅलेंटाइन डे अधिक खास
बनवण्यासाठी सादर करत आहे ‘हृदयात वाजे समथिंग’ कोल्हापूरच्या रांगड्या मातीत आणि उत्साही प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार
पडलेला, दमदार डान्स परफॉर्मन्सेस, खळखळून हसवणारे विनोदी स्किट्स आणि धमाकेदार गायकांची अप्रतिम गाणी अर्थात
मनोरंजनाने परिपूर्ण असलेला’हृदयात वाजे समथिंग’ हा कार्यक्रम ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता खास झी टॉकिज वर प्रसारि त होणार आहे!सिनेकलाकारांच्या दमदार परफॉर्मन्सेसनी या कार्यक्रमाला चार चांद लावलेत तसेच या खास कार्यक्रमाच्या उत्स ाहात भर घातलीती म्हणजे प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेता वैभव तत्ववादीने. या कार्यक्रमात तो लोकप्रिय सिनेमा सैराट मधील गाण्यांवर टॅलेंटेडडान्सर मीरा जोशी सोबत परफॉर्म करणार आहे. या सीझनची थीम आहे रोमान्स आणि मयुरेश पेम आणि माधवी नेमकरटाइमपास सिनेमातील ‘दाटले रेशमी’; या प्रसिद्ध रोमँटिक गाण्यावर परफॉर्म करणार आहेत. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरासांभाळली इंडस्ट्रीतील हास्यसम्राट व्यक्तीमत्व -नम्रता आवटे आणि प्रियदर्शन जाधव यांनी. फक्त एवढेच नाही! योगेश शिरसाट,सुहास परांजपे, आरती सोळंकी आणि समीर चौगुले हे विनोदवीर त्यांच्या कॉमेडीने प्रेक्षकांना मनोरंजित करणार आहेत. संगीत,लावणी, कथक आणि बहु-सांस्कृतिक परफॉर्मन्सेस आणि बरेच काही’हृदयात वाजे समथिंग’ द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.कोल्हापूरकरांसमोर परफॉर्म करण्याची भावना व्यक्त करताना वैभव तत्ववादी म्हणाले, ;फेब्रुवारी हा प्रेमाचा महिना आहे आणिअशा खास व विलक्षण उत्सवात सामील होण्यासाठी मला अतिशय आनंद झाला आहे. व्हॅलेंटाइन डे आता अगदी जवळ आलाअसताना, आम्ही सैराट मधील प्रेक्षकांना आवडणारी प्रेमाची गाणी निवडली आहेत. माझ्या परफॉर्मन्स शिवाय या शो मध्ये अजून
असे काही आहे की त्यामुळे तुम्ही हा व्हॅलेंटाइन सीझन आमच्या सोबतच साजरा कराल!
‘हृदयात वाजे समथिंग’ द्वारे झी टॉकिज तुम्हाला खात्री देत आहे उत्कृष्ट मनोरंजन, अखंड हास्य, चांगले संगीत आणि विलक्षण नृत्येयांनी भरलेल्या रात्रीचे.
‘हृदयात वाजे समथिंग’; साजरा करा प्रेमाचा सीझन
Date: