Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

काजोल आणि अजय देवगण चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर

Date:

2 3 4 5 6 7

 

मराठी चित्रपट आणि नाटकांच्या प्रसिद्धीची हवा सगळीकडे पसरविणारा कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘चला हवा येऊ द्या’. या मंचावरुन आजवर अनेक मराठी नाटक चित्रपटांना प्रसिद्धीचं हक्काचं व्यासपीठ मिळालं. या मंचाची लोकप्रियतेचा बोलबाला बॉलिवुडमध्येही मोठ्या प्रमाणावर आहे म्हणूनच तर या कार्यक्रमात रितेश देशमुख , जॉन अब्राहम, वरुण धवन, सोनम कपूर, विद्या बालन, इरफान खान या कलाकारांसोबतच शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार सारख्या आजच्या घडीच्या सुपरस्टार्सनीही हजेरी लावली. आता या यादीत आणखी एका स्टारचा समावेश झाला आहे. बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या शिवाय चित्रपटासाठी या मंचावर आला होता. अजय देवगण या कार्यक्रमात आपली पत्नी आणि अभिनेत्री काजोलसह सहभागी झाला. त्यांच्यासोबतीने संगीतकार मिथुनसुद्धा उपस्थित होते. येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या दोघांसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम’ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली. सिंघमच्या भूमिकेत भाऊ कदमने तर जयकांत शिकरेच्या भूमिकेत सागर कारंडेने विनोदाची चौफेर फटकेबाजी केली. याशिवाय थुकरटवाडीच्या कोर्टात अजय आणि काजोल दोघांनाही आरोपीच्या पिंज-यात बसवून त्यांच्यावर अनेक मजेदार आरोपही करण्यात आले. यावेळी कलाकारांचा अतरंगीपणा बघून अजय आणि काजोल दोघांचीही हसून हसून पुरेवाट लागली. या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे यात काजोलने मराठी भाषेत संवाद साधला. अजयनेही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. या दोघांचं हे मराठमोळं रुप येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणा-या चला हवा येऊ द्या च्या दोन्ही भागांमधून बघायला मिळेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...

“स्त्रियांच्या गरजा समजून घेतल्याशिवाय सेवा अपूर्ण”- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा ‘आरोग्यवारी’ उपक्रमात विशेष सहभाग

वारीतील महिला सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज; ‘आरोग्यवारी’ उपक्रमातून व्यापक व्यवस्था पुणे,...