Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

चला हवा येऊ द्या च्या मंचावर बाहुबलीचं विडंबन ..‘भाऊबली’ ?

Date:

चला हवा येऊ द्याच्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर ‘माहेरची साडी’ पासून ते ‘नटसम्राट’ , सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पासून आजच्या ‘दंगल’पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. आणि आता या मंचावर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचं मराठमोळं रुप. येत्या सोमवारच्या भागात म्हणजे १२ जूनला रात्री ९.३० वा. झी मराठीवर हे खास स्किट बघायला मिळणार आहे.

‘बाहुबली’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नवनवे विक्रम रचले. हा चित्रपट जेवढा लोकप्रिय ठरला त्यापेक्षाही जास्त चर्चिला गेला याचा पुढचा भाग असलेला बाहुबली २ हा चित्रपट. व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि डोळे दिपवणारे साहसदृष्ये ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये ठरली. अजूनही अनेक चित्रपटगृहात ‘बाहुबली २’ ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच आहे. बाहुबली २ ची ही लोकप्रियता बघता थुकरटवाडीकरांनीही मग प्रेरणा घेत भाऊबली हा चित्रपट बनवला. ज्यात भाऊबलीच्या मुख्य भूमिकेत भाऊ कदम, देवसेनेच्या भूमिकेत श्रेया बुगडे, भल्लाळदेवच्या भूमिकेत अंकुर, शिवगामीच्या भूमिकेत सागर कारंडे तिचा पती बिजालदेवच्या भूमिकेत भारत गणेशपुरे आणि कटप्पाच्या भूमिकेत कुशल बद्रिके बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे चित्रपटात ज्याप्रमाणे स्पेशल इफेक्ट्सचा खास वापर करण्यात आलाय तसाच वापर इथेही दिसणार आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रंगत-संगत प्रतिष्ठान, आम्ही एकपात्रीतर्फे पहिल्या वंदन राम नगरकर पुरस्काराचे वितरण

प्रतिसादातून कलाकारांचे जुळते रसिकांशी नाते : नितीन कुलकर्णी पुणे :...

पीएमपीएमएल बसच्या दरवाढीस आम आदमी पार्टीचा विरोध

बस दरवाढीमुळे प्रवासी घटतील, वाहतूक कोंडी, प्रदूषण वाढेल.. आप...

आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा, आरक्षण हे फक्त एक माध्यम” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

परभणीत शिवसेना महिला आघाडीचा मेळावा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...