Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘‘चला हवा येऊ द्या’’ च्या सेटवर मास्टर ब्लास्टर सचिन

Date:

क्रिकेट खेळायला लागल्यापासून विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं. ते स्वप्न पूर्ण व्हायला २२ वर्षांची तपश्चर्या मला करावी लागली. माझ्या हातात विश्वचषक आला तो माझ्यासाठी आयुष्यातील अमूल्य क्षण होता!! सचिन तेंडुलकर यांनी आपल्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण आणि अनेक आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते, ‘‘चला हवा येऊ द्या’’ च्या
मास्टर ब्लास्टर विशेष भागाचे!! झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या आगामी भागात मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर आला होता. या भागात सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. गप्पांची ही अनोखी मैफिल २२- २३ मे रोजी सोमवार आणि मंगळवारच्या भागात रसिकांना झी मराठीवर अनुभवता येणार आहे.

सचिनच्या सोबत त्याची पत्नी अंजली, त्याचे भाऊ नितीन तेंडुलकर, अजित तेंडुलकर, बहीण सविता तेंडुलकर, तसेच त्याचे मित्र अतुल रानडे, जगदीश चव्हाण आणि अजित भुरे हेही चला हवा येऊ द्या च्या सेटवर  हजर होते.

सचिनच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे क्षण चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर लवकरच अवतरणार असून क्रिकेट शौकिनांसाठी  आनंदाची बाब आहे. ‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’ चित्रपट ही आपल्या आयुष्यातली आणखी एक महत्त्वाची खेळी आहे, असं सांगत ही खेळी आपण आपल्या आई-बाबांना समर्पित करणार असल्याचं सचिनने सांगितलं. ‘सचिनः अ बिलियन ड्रिम्स’
मध्ये साहित्य सहवास ते शिवाजी पार्क मैदान आणि शारदाश्रम शाळा ते भारतरत्न हा सर्वोच्च किताब स्वीकारतानाचा त्याचा प्रवास उलगडला आहे. त्याच रोमहर्षक प्रवासाची झलक त्यानं चला हवा येऊ द्या मध्ये मारलेल्या या खास  गप्पांमधून उलगडत गेली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...

वारकरी संप्रदायाच्या गुणात्मक वृद्धीसाठी अभ्यासक्रमाची गरज

वारकरी संप्रदाय तत्वज्ञानावर आधारित वर्धिष्णु संप्रदाय ह. भ. प. योगीराज...

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी...