कात्रजच्या पेशवे तलावात युवकाचा बुडून मृत्यू

Date:

पुणे- : कात्रज येथील  पेशवे तलावात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी काही तरुण निघाले होते. त्यावेळी काहीजण बोटीने पुतळ्याच्या ठिकाणी पोहोचले. मात्र, ज्ञानेश्वर पांचाळ (वय २३, रा. कात्रज) या तरूणाने पोहत जाण्याचा निर्णय घेतला आणि तो कडेपर्यंत पोहोचू न शकल्याने पाण्यात बूडून त्याचा मृत्यू झाला.कात्रज अग्निशामक दलाच्या ५ जवानांनी मिळून दोन तासांच्या प्रयत्नानंतर पाण्यातून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. पेशवे तलावात पूजेसाठी पाण्यातून पोहून जाताना तलावाच्या मध्यात बूडून तरुणाचा मृत्यू झाला. सोबतच्या सहकाऱ्यांनी बोटीने येण्याचा आग्रह करुनदेखिल तलावात पोहण्याचा हट्ट युवकाला महागात पडल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले आहे. तत्पूर्वी, भारती विद्यापीठ पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

परराज्य शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र...

फॅसिस्ट विचार देशासाठी व जगासाठी घातक, फॅसिस्ट विचारापासून देशाला वाचण्याची गरज: हर्षवर्धन सपकाळ

भाजपा व आरएसएसकडून संविधान संपविण्याचा प्रयत्न, संविधान वाचले तर...

समाविष्ट ३२ गावांच्या मिळकतकर नोंदींच्या सखोल ऑडिटचा प्रस्ताव

दरवर्षी ५०० कोटींपेक्षा अधिक महसूल बुडण्याची शक्यता व्यक्त; GISसह...

७४ कोटींच्या कचरा प्रकल्पावर पुनर्विचाराचा प्रस्ताव; २० वर्षांच्या करारावर प्रश्न

निविदेनंतरच्या वाटाघाटी आणि कालावधीवाढीवर आक्षेप; ९ सप्टेंबरच्या स्थायी समिती...