पुणे: लहान मुलांना त्यांच्यातील माॅडेलिंग टॅलेंट दाखविण्याची संधी ‘यंग पुणे स्टार्स’ तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही स्पर्धा (अ) वर्षे ४ पर्यंत (ब) ५-८ आणि (क) ९-१२ अशा तीन वयोगटांत सेलिब्रेटी फोटोग्राफर समीर बेलवलकर यांच्या देखरेखी खाली घेण्यात येणार आहे. स्पर्धेच्या दरम्यान स्पर्धकांमध्ये असलेले उपजत गुण व कौशल्य हेरून समीर बेलवलकर त्यांना योग्य मार्गदर्शनही करतील.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी समीर बेलवलकर यांनी काढलेल्या स्पर्धकांच्या ६ नवीन फोटोजचा पोर्टफोलियो असणे आवश्यक आहे. त्या साठी रु. ४९९९ शुल्क आकारण्यात येईल. यां शुल्कात दोन लुक्स, मेकअप आंणि हेअर स्टाईलचा समावेश असेल. स्पर्धे साठी वेगळी प्रवेश फी नाही.
हे फोटोज दि. १९ ते २३ डिसेंबर या दरम्यान समीर बेलवलकर यांच्या लाॅ काॅलेज रोडवरील ‘स्टुडिओ ८१० बी’ येथे काढण्यात येतील. स्पर्धकांचे पोर्टफोलिओज फेशन इंडस्ट्रीमधील नामवंत जजेस कडे पाठवले जातील व स्पर्धेचे निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कळवले जातील.फोटोसेशन्सची तारीख – शनिवार, १९ डिसेंबर ते शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६स्थळ – स्टुडिओ ८१० बी, लॉ कॉलेज रोड,संपर्क – ९८२३०३३२७०इमेल- images@sameerbelvalkar.com