पुणे : आपल्या कमवा आणि शिका या योजनेद्वारे स्वावलंबी शिक्षणाचा मूलमंत्र देणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ९ मे हा स्मृतिदिन यानिमित्त ‘यशस्वी एकेडमी स्किल्स’ संस्थेतर्फे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
‘यशस्वी’ संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत यशस्वी चे प्रशासन विभाग प्रमुख प्रसाद शाळीग्राम, जनसंपर्क प्रमुख योगेश रांगणेकर, कौशल्यसेतू अभियान समन्वयक श्रीकांत तिकोने, ग्राफिक डिझायनर शाम वायचळ, प्रथमेश पाटील, संदीप खेंगरे, अक्षय नाणेकर आदी उपस्थित होते.