पुणे : मंगळवारी २६ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर पुणे येथील यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यासंतमाई स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यानी राज्यघटनेची मूल्ये पाळण्याचा निर्धार केला तसेच याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. देशाच्या घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. आणि त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून या राज्यघटनेची अंलबजावणी सुरु झाली. या घटनेची आठवण म्हणून देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता व लोकशाही हि मूल्ये जनमानसात रुजावी या साठी आपण सर्वानी प्रयत्नशील राहायला हवे असे मत यावेळी ‘यशस्वी’ संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कार्यक्रमाला संस्थेच्या प्रशिक्षिका विद्या कडू, समृद्धी कोपल्लू, मीनाक्षी हिरेमठ, शाम वायचळ, योगेश रांगणेकर यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होत्या.