कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी –कामगारमंत्री हसन मुश्रीफ

Date:

  • हसन मुश्रीफ यांनी स्वीकारला कामगार विभागाचा कार्यभार

मुंबई, दि. 7 : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कामगार विभागाचा कार्यभार स्वीकारला. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद – सिंगल यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री श्री.मुश्रीफ यांचे स्वागत केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहेत. कामगारांनी स्थलांतर करु नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.

श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात सर्व दवाखान्यांद्वारे अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलबध करुन देण्यात आल्या असून कोणत्याही परिस्थितीत कोविड अथवा इतर रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात अडचणी येणार नाहीत. तसेच या काळात कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने, उद्योग तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत याची संपूर्ण दक्षता व काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच स्वयंरोजगारीत असलेल्या सर्व कामगार व असंघटीत क्षेत्रातील कामगार यांनी आपापल्या क्षेत्रातील कारखाने, उद्योग यांमध्ये कोविड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून कामकाज नियमित चालू राहील याबाबत निश्चित रहावे. राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोविड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भीती बाळगू नये. सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था देखील होणार आहे. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतांना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

मंत्री श्री.मुश्रीफ यांनी विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतली. यावेळी राज्यातील मजूर व कामगारांच्या सध्याच्या अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सैनिकी वसतिगृहात पहारेकरी व माळी पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात भरती

पुणे, दि. १: सैनिकी मुलींचे वसतिगृह, नवीपेठ, पुणे-४११०३० येथे...

गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यास निर्बंध

पुणे, दि. १: जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांततेत...

२७ ते ३१ ऑगस्टदरम्यान आठही देवस्थानांना भेट; उपसभापती असताना दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीची पाहणी

प्रत्येक देवस्थानाला वैयक्तिक रु. १२ हजारांची देणगी; लेण्याद्री व...

शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचला पाहिजे : डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने ऑक्टोबरमध्ये ‘स्त्रीवादी साहित्य संमेलन’-- डॉ.गोऱ्हे स्त्री...