मुंबई-वेदांता-फोक्सकाॅन प्रकल्प गुजरातला होणार हा कंपनीचे प्रमुख अनिल अग्रवाल यांचा निर्णय आमचे सरकार येण्यापूर्वी झाला, पण आम्ही काय केले तर आम्ही प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा यासाठी निकराची शर्थ लावली. ज्यांनी काहीच केले नाही ते आम्हाला आता शहाणपण शिकवत आहेत. तुमचे कर्तृत्व काय? हे आम्हाला सांगा असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केला.फडणवीस म्हणाले, मविआच्या काळात महाराष्ट्र गुजरातच्या मागे राहीला असेल पण आता पुढील दोन वर्षात आम्ही महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर नेऊ. गुजरात पाकिस्तान थोडीच आहे पण हेल्दी स्पर्धा आहे.फडणवीस म्हणाले, सगळं बंद करणार असे धोरण मविआचे होते. त्यामुळे आपण गुजरातच्या पुढे कसे जाणार. रिफायनरी जर केली तर महाराष्ट्र पुढे जाईल. दहा वर्षे कुणी महाराष्ट्राचा हात धरू शकणार नाही.फडणवीस म्हणाले, प्रत्येक सबसीडी मिळवण्यासाठी दहा टक्के पैसे द्यावे लागत होते. हा गत दोन वर्षांतील प्रकार होता, लाच द्यावी लागत होती त्यामुळे काय अवस्था होत आहे. हा मविआला माझा सवाल आहे. आमच्या सत्ताकाळात एक नवा पैसा कुणाला द्यावा लागला नाही.फडणवीस म्हणाले, वेदांता – फाॅक्सकाॅनचे मुख्य अनिल अग्रवाल यांनी तत्काळ वस्तूस्थिती मांडली पण तीन पत्रकार नॅरेटीव्ह तयार करीत आहेत. ते त्यांच्या संस्थेसाठी नव्हे तर राजकीय नेत्यांसाठी काम करीत आहेत.फडणवीस म्हणाले, मी शपथ घेतल्यानंतर एमआयडीसीच्या सीईओशी चर्चा केली. तेव्हा हा प्रकल्प गुजरातेत जाणार अशी चिन्हे दिसत होती. त्यानंतर आम्ही अनिल अग्रवाल यांना बोललो. पत्र लिहिले आणि त्यांच्या घरीही गेलो. त्यावेळी ते म्हणाले आम्ही अॅडव्हान्स स्टेजमध्ये गेलो. आम्ही निर्णयावर पोहचलो आहेत, आता आम्हाला परत येणे कठीण आहे, पण आमचा महाराष्ट्रातही कल आहे. आम्ही महाराष्ट्रातही गुंतवणूक करू असे त्यांनी सांगितले.फडणवीस म्हणाले, आम्ही अनिल अग्रवाल यांना गुजरातपेक्षा चांगले पॅकेज दिले पण त्यांचा गुजरातचा निर्णय ठरलेला होता. आमचा कल आहे की, आम्ही महाराष्ट्रात निश्चित गुंतवणुक करू. फारवर्ड गुंतवणूक महाराष्ट्रातच आहे आणि हीच खरी गुंतवणूक आहे असे त्यांनी आम्हाला आश्वासित केले.फडणवीस म्हणाले, आम्ही इन्फ्रास्ट्रकचरल लेड ग्रोथ मॅनेजमेंटचे आमचे धोरण आहे. नागपूर मुंबई एक्स्प्रेस वे चा आम्ही निर्णय घेतला तेव्हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी विरोध करीत तेथे सभा घेतल्या पण आम्ही तो पूर्ण केला. माझा दावा आहे की, एकदा तो पूर्ण सुरू झाला तर तो नेक्स्ट काॅरीडाॅर ठरणार आहे.