पुणे-डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वसंतोत्सवाला आजपासून स्वारगेट येथील गणेश कला क्रिडा मंच येथे सुरुवात झाली. महोत्सवाचे हे सलग 14 वे वर्ष असून आज प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, सारस्वत बॅकेच्या व्यवस्थापकीय संचालिका संगीता संधाणे, रावेतकर गृपचे व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर, डाॅ. वसंतराव देशपांडे यांचे पुत्र बापू देशपांडे, प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची कन्या रेणूका देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करीत महोत्सवाला सुरूवात करण्यात आली. शनिवार 20 फेब्रुवारी आणि रविवार 21 फेब्रुवारी रोजी सायं 4 ते 10 वाजेपर्यंत सदर महोत्सव गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडणार आहे. धृपद गायन, शास्त्रीय गायन, तालवाद्य, दक्षिणात्य व हिंदुस्थानी संगीताचा मेळ असलेल्या वैविध्यपूर्ण संगीताची मेजवानी हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य असेल. याबरोबरच यंदाचा महोत्सव डॉ. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षपूर्ती सोहळा म्हणून आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू व प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी यावेळी दिली.
वसंतोत्सवाला आजपासून गणेश कला क्रिडा मंच येथे सुरुवात
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/
पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल ..
C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079
मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com
- State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra
*1984 पासून पुण्यात पत्रकारिता,
*आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ,
*आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद,
*पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ...
*स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले
*इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका .
*निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार
https://www.facebook.com/MyMarathiNews/
Popular
More like thisRelated
जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी
मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...
लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा
महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश.मुंबई...
इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर
नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...
मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला
मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...

