कमला नेहरू रुग्णालयात रक्तपेढीसह आवश्यक असलेली विविध कामे तातडीने मार्गी लावावीत- गणेश बिडकर

Date:

पुणे- महानगर पालिकेच्या कमला नेहरू रूग्णालयात सुसज्ज रक्तपेढी उभारण्याबरोबरच विविध विभाग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना पालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी मंगळवारी प्रशासनाला केल्या.
पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणा-या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न कमला नेहरू रूग्णालय आहे. या पार्श्वभूमीवर या रूग्णालयात नागरिकांच्या सोयीसाठी अनेक विभाग सुरू केले जाणार आहेत. विविध बाह्यरुग्ण विभाग येथे सुरू केले जाणार असून त्यातील काही काम सुरू करण्यात आले आहे. पालिकेतील विविध खात्यांच्या विभागप्रमुखांसह सभागृह नेते गणेश बीडकर यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या सूचना प्रशासनाला करत ही काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, डॉ. अंजली साबणे, भवन विभागाचे शिवाजी लंके, वैद्यकीय अधिक्षक डॉ. लता त्रिंबके यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. कमला नेहरू रूग्णालयात दिल्या जाणा-या आरोग्य सुविधांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या रूग्णालयात सुरू होत असलेल्या विभागांसाठी आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तसेच तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही गणेश बिडकर यांनी दिली. पालिकेच्या भवन रचना, विद्यूत या दोन विभागांनी आपली कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना करताना पुढील पंधरा दिवसात पुन्हा या कामाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अबब.. एकट्या कोथरूड मध्ये निघाला 2 हजार 967 किलो ई – कचरा :10 संकलन केंद्रे कार्यान्वित

पुणे - पुणे महापालिकेच्या कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालय घनकचरा...

पुणे-वाराणसी ‘अमृत भारत’ एक्सप्रेसला मंजुरी; पुणे-जबलपूर रेल्वेही होणार नियमित

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश पुणे-जबलपूर...

सभासद संस्थेसोबत निष्ठेने असले तर कितीही अडचणी आल्या तरी संस्था संपत नाही

सहकारी संस्था कार्यकर्ता चर्चासत्रादरम्यान मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे प्रतिपादन सातारा -...