पुणे – कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर, आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यावरील उपचार महागडे आहेत. यावर उपचार घेणे, सर्व सामान्य रुग्णाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत करण्यात आला आहे. आजपर्यंत महापालिकेच्या माध्यमातून १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य संबधित रुग्णांच्या बिलावर शहरी गरीब योजनेतून दिले जात होते. मात्र आता म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा यात समावेश करुन म्युकरमायकोसिसच्याच उपचारांसाठी ही मर्यादा १ लाखांवरुन ३ लाख रुपयांपर्यंत वाढ कऱण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पञकार परिषदेत ही माहिती दिली.
ते म्हणाले,’शहरी गरीब योजने अंतगेत दारिद्ययरेषेखाली आणि पिवळे काडे असणार्या नागरिकांच्या घरातील एका व्यक्तीवर १ लाखा पयेतअर्थसहाय्य दिले जात होते.
. ककेरोग , हदय रोग , किडनी प्रत्यारोपणसाठी या योजनेत २ लाख पयेत
अर्थसहाय्य दिले जात आहे. . कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर, आता म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यावरील उपचार महागडे आहेत. यावर उपचार घेणे, सर्व सामान्य रुग्णाला परवडत नाही. त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरात म्युकरमायकोसिस आजाराच्या उपचारांचा समावेश शहरी गरीब योजनेत करण्यात आला आहे. म्युकरमायकोसिसच्याच उपचारांसाठी ही मर्यादा १ लाखांवरुन ३ लाख रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्त विक्रम कुमार यांनी ठेवला होता. या प्रस्तावाला सवेसाधारण सभा मान्यता देईल या भरवश्यावर स्थायी समितीने मान्यता दिली आहे असे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
स्थायी समिती सभेतील महत्वाचे निर्णय:
१. पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दुर्बल घटकातील नागरिकांना शहरी गरीब योजनेअंतर्गत Mucormycosis आजारावर पुणे महापालिकेच्या पॅनलवरील खासगी रुग्णालयामध्ये ३ लाखापर्यंत होणाऱ्या १००% उपचार खर्चास मान्यता देण्यात आली.
२. कोवीड च्या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या विद्युत दाहिनी आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील वारसांना रु. १० लाख देण्यास मंजुरी देण्यात आली.
३. मिळकती वारसा नोंदी करता प्रथमतः कर देण्यास पात्र असलेली कोणतीही व्यक्ती मृत्यू पावल्यास मयत व्यक्तीच्या मालकी हक्काची वारस हस्तांतरण फी संपूर्णतः माफ केली आहे. वारस नोंद करतांना यामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार होत नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. या बाबींमुळे नागरिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.
४. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे आस्थापनेवर असलेल्या मंजूर पदांपैकी रिक्त असलेल्या विविध पदांची भरती करार पद्धतीने तात्काळ घेण्यास मंजुरी.
५. राज्यात देशात आणि पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून ठिकठिकाणी ऑक्सिजन ची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ऑक्सिजनच्या मागणीच्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका वाढला आहे. सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेच्या दळवी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.