पुणे – पुणेकर खाद्यप्रेमींना आनंद साजरा करण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ पुरवणारी लोकप्रिय साखळी ‘अपसाऊथ’ने पुण्यातील आपले चौथे आऊटलेट कॅम्पमध्ये ‘अपसाऊथ एक्स्प्रेस’ नावाने सुरु केले आहे.
‘अपसाऊथ एक्स्प्रेस’ प्रकारचे हे पुण्यातील दुसरे रेस्टॉंरंट आहे. (पहिले रेस्टॉरंट कोंढव्यात सहा महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे.) ते मूळ अपसाऊथ आऊटलेटपेक्षा किंचित वेगळे आहेच, परंतु आपल्या नेहमीच्या रेस्टॉरंटपेक्षाही अगदी भिन्न आहे. येथे तुम्हाला सजावट केलेले टेबलक्लॉथ किंवा आदरातिथ्य तत्पर वेटर्स आढळणार नाहीत. हे दिखाऊपणा नसलेले, उभे राहून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचे ठिकाण आहे. येथील खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला अस्सल आणि चविष्ट असे खाद्यपदार्थ अत्यंत जलद सेवेसह मिळतात. विद्यार्थी आणि नोकरदारांना सकाळी झटपट खाऊन आपले कामाचे ठिकाण गाठण्याची घाई असते. त्यांच्यासाठी हे रेस्टॉरंट आदर्श ठिकाण आहे.
‘अपसाऊथ एक्स्प्रेस’मध्ये अत्यंत लोकप्रिय व जगभर आवडते असे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ झटपट उपलब्ध होतात. त्यात इडली, मसाला डोसा, मेदूवडा, उथप्पा हे पदार्थ चटणी व सांबार यासह मिळतात आणि पाठोपाठ वाफाळती फिल्टर कॉफीही सज्ज असते. हे सर्व पदार्थ सर्व्ह करण्यात थोडाही वेळ गमावला जात नाही. ग्राहकाला इडलीची प्लेट २० रुपयांत, इडली वडा ३५ रुपयांत आणि अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफी केवळ १५ रुपयांत मिळते. येथील खाद्यपदार्थांच्या किंमती स्पर्धात्मक असून प्रतिव्यक्ती सरासरी खर्च केवळ ३५ ते ६५ रुपये येतो. उत्तम दर्जाचे खाद्यपदार्थ व पैशाचे पुरेपूर मूल्य येथे दिले जाते.
‘अपसाऊथ एक्स्प्रेस’ हा ‘बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’चा क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) ब्रँड आहे. ‘बिलियन स्माईल्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’ ही भारताची आघाडीची दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ पुरवणारी हॉटेल साखळी असून ‘अपसाऊथ’खेरीज त्यांचे ‘बॉनसाऊथ’ व ‘साऊथइंडिज’ हेही प्रख्यात ब्रँड्स आहेत.
दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ आधुनिक व जलद सेवा पद्धतीने ग्राहकांना देण्यासाठी ‘अपसाऊथ एक्स्प्रेस’ कटिबद्ध आहे. उत्पादने व सेवा हे दोन्ही पुरवताना अत्युच्च दर्जा, किमान वाजवी किंमत व आरोग्यदायी वातावरण राखले जाते. ‘अपसाऊथ’ आपले पदार्थ बनवताना ताज्या घटक पदार्थांचा वापर करते. अनेक बड्या आंतरराष्ट्रीय साखळ्यांमध्ये औद्योगिक तत्त्वावर उच्च प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात, तसे ‘अपसाऊथ’मध्ये नसते.
प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांमुळे पाश्चिमात्य देशांमध्ये लठ्ठपणाची मोठी समस्या उभी राहिली आहे. ताज्या घटक पदार्थांपासून बनवलेले भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ हा अशा समस्यांवर उत्तम उपाय आहे. दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ चविष्ट, आरोग्यपूर्ण घटकांनी परिपूर्ण, पोटासाठी हलके असतात.
यासंदर्भात ‘अपसाऊथ’चे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ मनू नायर म्हणाले, की ग्राहकांसाठी सोई-सुविधा निर्माण करण्यास आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. आमच्या आऊटलेटमधील उत्पादनांच्या किंमती इतक्या वाजवी व किफायती आहेत, की तशा पुण्यातील कोणत्याही ब्रँडेड आऊटलेटमध्ये कधी अनुभवासही आल्या नसतील. काळाशी सुसंगती राखून ‘अपसाऊथ एक्स्प्रेस’ने दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचा आनंद समकालीन बदलांसह अधिकच वृद्धिंगत केला आहे. आम्ही आरोग्यपूर्ण, चविष्ट, ताजे व पोषणमूल्याने परिपूर्ण असे दक्षिण भारतीय शाकाहारी पदार्थ आधुनिक प्रकारांत सादर केले आहेत.
‘अपसाऊथ एक्स्प्रेस’ने विस्ताराचीही योजना आखली असून चालू वर्षअखेरीपर्यंत पुण्यात त्याची आणखी चार आऊटलेट्स उघडली जात आहेत.
दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ हे अत्यंत लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थांपैकी समजले जातात आणि दिवसभर कधीही म्हणजे न्याहारी, दुपारच्या भोजनात, सायंकालीन स्नॅक्स किंवा रात्रीच्या जेवणात त्यांचा समावेश सुयोग्य ठरतो. यामुळेच ‘अपसाऊथ’ला देशभरात यशस्वी जलद सेवा रेस्टॉरंट्स उभारण्याची मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया‘अपसाऊथ’चे व्यवसाय प्रमुख कुमार गौरव यांनी व्यक्त केली आहे.
‘अपसाऊथ एक्स्प्रेस’मधील खाद्यपदार्थ इतके उत्कृष्ट व लज्जतदार आहेत, की त्यांचा आस्वाद घेण्यासाठी टेबल नसले तरीही ग्राहकांना काहीच उणीव भासणार नाही. ‘अपसाऊथ एक्स्प्रेस’चा पत्ता – साचापीर स्ट्रीट, कराची स्वीटमार्टसमोर, कॅम्प, पुणे