पुण्यातील इंजिनिअर चैताली पाटील यांना ‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन’ बहुमानाचा मुकूट

Date:

पुण्यातील इंजिनिअर चैताली पाटील यांनी नुकत्याच झालेल्या ‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन २०१९’ सौंदर्य स्पर्धेत बहुमानाचा मुकूट, तसेच ‘टॉप मॉडेल २०१९’ हा सन्मानही पटकावला.

हयात पुणे हॉटेलमध्ये संपन्न झालेली ही स्पर्धा ‘दिवा पेजंट्स’च्या अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांनी आयोजित केली होती. भारतभरातून ४२ महिला स्पर्धकांची निवड स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी झाली होती. त्यामध्ये चैताली यांनी सिल्व्हर श्रेणीमध्ये बहुमानाचा मुकूट पटकावला.

ही स्पर्धा ५ फेऱ्यांत झाली, ज्यात बुद्धिमत्ता फेरी (टॅलेंट राऊंड), छायाचित्रण (फोटोशूट), परिचय (इंट्रोडक्शन), पारंपरिक व पाश्चिमात्य पेहरावात पदन्यास (रॅम्प वॉक विथ ट्रॅडिशनल अँड वेस्टर्न अटायर) आणि प्रश्नोत्तर सत्र (क्वेश्चन अँड आन्सर सेशन) यांचा समावेश होता.

किताब जिंकल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चैताली पाटील म्हणाल्या, “सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन मुकूट पटकावण्याचे माझे बालपणापासूनचे स्वप्न होते. महाविद्यालयीन काळातही मी तीन सौंदर्य स्पर्धांत भाग घेऊन जिंकले होते. आज हा प्रतिष्ठेचा बहुमान जिंकल्यानंतर माझे स्वप्न साकार झाले आहे.”  

स्पर्धेच्या नामवंत परीक्षक मंडळात प्रसिद्ध तारका व व्यक्तींचा समावेश होता. अभिनेता अश्मित पटेल, अभिनेत्री मुग्धा गोडसे व डॉ. अदिती गोवित्रीकर, ‘द बॉडी क्लिनिक’च्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. रचना शर्मा, मिसेस इंडिया २०१८ विजेत्या डॉ. गौरांगी श्रावत, आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्यांगना सिमरन गोधवानी, आंतरराष्ट्रीय मॉडेल पिया पावानी, हयात पुणेचे डीओएसएम कमल शर्मा, कार्ल मस्कारेन्हास यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

 चैताली या यशस्वी स्थापत्य सिव्हिल इंजिनिअर असून सध्या त्या थिस्सेनक्रप इंडस्ट्रीज इंडिया कंपनीत काम करतात. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ललित प्रभाकरचा ‘प्रहार’ आता OTT वर पाहता येणार; कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या

चित्रपटगृहात जाऊन प्रहार पाहायचा राहून गेला असेल, आपल्या लाडक्या...

डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा लाभ घेण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

जिल्हा कोषागार कार्यालयात केंद्र शासनाच्या अवर सचिवांची भेट; जीवन...

पाऊस पडूनही खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा घटला; पाच दिवसांत ०.६१ टीएमसी पाणी कमी!

चार धरणांत अवघा ८०.५२ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा ४.९३ टीएमसी...