मुंबई, 31 जुलै 2021
महान देशभक्त क्रांतीकारक शहीद उधमसिंग यांच्या 31 July 2021 रोजी असणाऱ्या 81 व्या पुण्यतिथीला त्यांना आदरांजली म्हणून फिल्म्स डिव्हिजन शहीद उधमसिंग यांच्यावरील जीवनचरित्रपट प्रदर्शित करत आहे. भारत@75 सोहळ्याचा मुकुटमणी असलेल्या ‘आझादी का अमृतमहोत्सव’ चा भाग म्हणून या चरित्रपटाचा विशेष खेळ आयोजित करण्य़ात आला आहे. हा जीवनचरित्रपट स्वातंत्र्याची आस आणि निर्धार यांचे अनोखे मिश्रण असलेल्या शहीद-ए-आझम शहीद उधम सिंग यांचे जीवन आणि धेय्य यांची कहाणी सांगतो. https://filmsdivision.org/ मधील ‘Documentary of the Week’ या भागामध्ये तसेच https://www.youtube.com/user/FilmsDivision या लिंकवर 24 तासांकरीता राहील उपलब्ध .