पुणे -अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालया मध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हरित वारी उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण ही काळाची गरज असून, पर्यावरण समृध्दीसाठी झाडे लावणे गरजेचे आहे. वृक्षारोपण करून आपले काम येथेच संपत नाही तर त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर सोहळ्यामध्ये पेरू, जांभूळ, फणस, आंबा, कैलासपती, बदाम यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.गणेश कोंढाळकर, क्रीडा संचालक प्रा.नवनाथ सरोदे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.विक्रम घीये यांनी केले. हा वृक्षारोपण सोहळा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डीस्टसिंगचे नियम पळून पार पडला.