नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यात वाढ केली आहे. जनरल ते एसी श्रेणीचा प्रवास यामुळे महागला आहे. प्रती किलोमीटर एक ते चार पैसे अशी वाढ करण्यात आली. यामुळे प्रवाशांना आता जास्त भाडे द्यावे लागेल, लांब अंतराच्या प्रवासावर या भाडेवाढीचा परिणाम अधिक जाणवणार आहे. नवे भाडे एक जानेवारी २०२० पासून लागू होतील.
सर्वसाधारण रेल्वेच्या नॉन एसी सेकंड क्लासचे भाडे किलोमीटरमागे एक पैशाने वाढवण्यात आले आहे. स्लीपर क्लासचे भाडेही एक पैशाने वाढले आहे, तर प्रथम श्रेणीचे भाडे एक पैशाने वाढणार आहे.
मेल एक्स्प्रेस रेल्वेंच्या द्वितीय श्रेणीत प्रवासासाठी आता किलोमीटरमागे २ पैसे जास्त द्यावे लागतील. स्लीपर क्लास तसेच प्रथम श्रेणी प्रवासी भाडे किलोमीटरमागे २ पैशांनी वाढवण्यात आले आहे.
वातानुकूलित श्रेणीत (एसी) चेअर कारचे भाडे किलोमीटरमागे चार पैसे, एसी-३ श्रेणीसाठी चार पैसे, एसी-२ श्रेणीसाठी चार पैसे, एसी-फर्स्ट क्लासचे भाडे किलोमीटरमागे चार पैसे अशी वाढ करण्यात आली आहे.
आधी आरक्षित तिकिटांवर वाढ लागू नाही
रिझर्व्हेशन चार्ट, सुपरफास्ट चार्ज मध्ये बदल करण्यात आलेला नाही. नवी भाडेवाढ आधीच बूक केलेल्या तिकिटांवर लागू होणार नाही. भाडेवाढ शताब्दी, राजधानी रेल्वेंसाठीही लागू राहील.
सर्व श्रेणींसाठी नवी भाडेवाढ अशी
श्रेणी | भाडेवाढ | १००किमी | ५००किमी | १०००किमी |
साधारण नॉन एसी
सेकंड क्लास स्लीपर क्लास फर्स्ट क्लास |
01 पैसा / किमी
01 पैसा / किमी 01 पैसा / किमी |
1 रु.
1 रु. 1 रु. |
5 रु.
5 रु. 5 रु. |
10 रु.
10 रु. 10 रु. |
मेल/ एक्स्प्रेस नॉन एसी
सेकंड क्लास स्लीपर क्लास फर्स्ट क्लास |
02 पैसे / किमी
02 पैसे / किमी 02 पैसे /किमी |
2 रु.
2 रु. 2 रु. |
10 रु.
10 रु. 10 रु. |
20 रु.
20 रु. 20 रु. |
एसी क्लास
चेअर कार एसी-3 श्रेणी एसी -2 श्रेणी एसी फर्स्ट क्लास |
04 पैसे / किमी
04 पैसे / किमी 04 पैसे / किमी 04 पैसे / किमी |
4 रु.
4 रु. 4 रु. 4 रु. |
20 रु.
20 रु. 20 रु. 20 रु. |
40 रु.
40 रु. 40 रु. 40 रु. |