आज पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 90 हजार 145

Date:

पुणे विभागातील 14 लाख 28 हजार 845 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 15 लाख 49 हजार 707 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 30 : पुणे विभागातील 14 लाख 28 हजार 845 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 49 हजार 707 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 90 हजार 145 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 30 हजार 717 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.98 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.20 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 10 हजार 497 रुग्णांपैकी 9 लाख 63 हजार 954 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 29 हजार 880 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 663 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.39 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 62 हजार 712 रुग्णांपैकी 1 लाख 35 हजार 409 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 186 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 117 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 50 हजार 393 रुग्णांपैकी 1 लाख 38 हजार 208 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 257 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 928 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 16 हजार 514 रुग्णांपैकी 1 लाख 588 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 552 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 9 हजार 591 रुग्णांपैकी 90 हजार 686 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 270 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 635 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 8 हजार 610 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 327, सातारा जिल्ह्यात 2 हजार 158, सोलापूर जिल्ह्यात 828, सांगली जिल्ह्यात 1 हजार 78 तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 219 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 10 हजार 533 आहे. पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 936, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 294, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 440, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 204 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 659 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 26 लाख 40 हजार 762, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 33 हजार 655, सोलापूर जिल्हयामध्ये 5 लाख 48 हजार 597, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 97 हजार 775 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 60 हजार 682 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 86 लाख 55 हजार 889 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 15 लाख 49 हजार 707 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 29 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पात्र मतदारांची अचूक नोंदणी व निर्धारित कालमर्यादेत काम पूर्ण करण्याच्या सूचना

पुणे-मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision -...

पाच कोटींचा वेतन अपहार- मारुती नवले,सुनंदा नवले,रचन नवले,रोहित नवले यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे-सिंहगड एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह सात जणांविरुद्ध...

विश्रांती हॉस्पिटलकडून बालकांच्या कर्करोगासाठी निःशुल्क उपचार योजना सुरू,औषधे, केमोथेरपी व रेडिएशन थेरपी पूर्णपणे विनामूल्य

आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील बालरुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, औषधे, केमोथेरपी...