पुणे विभागातील 19 ला 54 हजार 634 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 20 लाख 4 हजार 429 रुग्ण–विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणेदि. 15 :- पुणे विभागातील 19 लाख 54 हजार 634 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 लाख 4 हजार 429 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 330 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 465 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.52 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 45 हजार 905 रुग्णांपैकी 11 लाख 21 हजार 984 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 7 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 914 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.91 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 50 हजार 251 रुग्णांपैकी 2 लाख 41 हजार 766 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 113 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 372 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 2 हजार 821 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 4 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 774 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 9 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 428 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 233 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 6 हजार 443 रुग्णांपैकी 2 लाख 452 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 203 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 788 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 743 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 523, सातारा जिल्ह्यात 65, सोलापूर जिल्ह्यात 98, सांगली जिल्ह्यात 41 तर कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 786 आहे. पुणे जिल्हयामध्ये 391, सातारा जिल्हयामध्ये 255, सोलापूर जिल्हयामध्ये 107, सांगली जिल्हयामध्ये 33 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 0 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 76 लाख 20 हजार 566 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 20 लाख 4 हजार 429 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )