पुणे विभागातील 19 लाख 57 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 20 लाख 6 हजार 54 रुग्ण –विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे दि. 18 :- पुणे विभागातील 19 लाख 57 हजार 128 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 20 लाख 6 हजार 54 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 412 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 41 हजार 514 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.56 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 47 हजार 29 रुग्णांपैकी 11 लाख 23 हजार 470 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 4 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.65 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.95 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 50 हजार 452 रुग्णांपैकी 2 लाख 42 हजार 255 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 812 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 385 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 2 हजार 988 रुग्णांपैकी 1 लाख 97 हजार 324 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 610 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 112 रुग्णांपैकी 1 लाख 93 हजार 547 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 208 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 6 हजार 473 रुग्णांपैकी 2 लाख 532 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 152 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 789 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 560 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 398, सातारा जिल्ह्यात 72, सोलापूर जिल्ह्यात 57, सांगली जिल्ह्यात 28 तर कोल्हापूर जिल्ह्यात 5 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1026 आहे. पुणे जिल्हयामध्ये 523, सातारा जिल्हयामध्ये 369, सोलापूर जिल्हयामध्ये 82, सांगली जिल्हयामध्ये 36 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 16 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 76 लाख 96 हजार 957 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 20 लाख 6 हजार 54 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 17 ऑक्टोबर 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )