पुणे विभागातील 17 लाख 70 हजार 892 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 18 लाख 45 हजार 814 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे -: पुणे विभागातील 17 लाख 70 हजार 892 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 45 हजार 814 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 36 हजार 857 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 65 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.94 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा- पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 84 हजार 111 रुग्णांपैकी 10 लाख 56 हजार 50 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 858 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.41 टक्के आहे.
सातारा जिल्हा- सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 18 हजार 167 रुग्णांपैकी 2 लाख 3 हजार 970 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 916 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 281 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा- सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 76 हजार 109 रुग्णांपैकी 1 लाख 68 हजार 60 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 500 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 549 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा-सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 74 हजार 128 रुग्णांपैकी 1 लाख 62 हजार 160 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 365 आहे.कोरोनाबाधित एकूण 4 हजार 603 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा- कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 93 हजार 299 रुग्णांपैकी 1 लाख 80 हजार 652 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 218 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 429 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 916 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 87, सातारा जिल्ह्यात 861, सोलापूर जिल्ह्यात 411, सांगली जिल्ह्यात 846 तर कोल्हापूर जिल्ह्यात 711 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 479 आहे. पुणे जिल्हयामध्ये 640, सातारा जिल्हयामध्ये 675, सोलापूर जिल्हयामध्ये 501, सांगली जिल्हयामध्ये 837 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 826 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 27 लाख 75 हजार 980 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 45 हजार 814 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 30 जुलै 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)