पुणे विभागातील 17 लाख 86 हजार 580 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 18 लाख 59 हजार 873 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 4 : पुणे विभागातील 17 लाख 86 हजार 580 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 59 हजार 873 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 34 हजार 938 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 355 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.03 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 87 हजार 755 रुग्णांपैकी 10 लाख 60 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 447 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 255 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.45 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 20 हजार 949 रुग्णांपैकी 2 लाख 7 हजार 193 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 401 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 78 हजार 308 रुग्णांपैकी 1 लाख 69 हजार 329 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 405 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 574 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 77 हजार 335 रुग्णांपैकी 1 लाख 65 हजार 544 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 118 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 673 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 95 हजार 526 रुग्णांपैकी 1 लाख 84 हजार 461 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 567 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 740 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 101, सातारा जिल्ह्यात 621, सोलापूर जिल्ह्यात 543, सांगली जिल्ह्यात 862 तर कोल्हापूर जिल्ह्यात 613 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 212 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 27, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 242, सोलापूर जिल्हयामध्ये 213, सांगली जिल्हयामध्ये 782 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 948 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 30 लाख 48 हजार 82 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 59 हजार 873 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 3 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)