पुणे विभागातील 18 लाख 8 हजार 852 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 18 लाख 80 हजार 162 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 10 : पुणे विभागातील 18 लाख 8 हजार 852 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 80 हजार 162 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 32 हजार 552 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 758 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.21 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 93 हजार 297 रुग्णांपैकी 10 लाख 66 हजार 785 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 186 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 326 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे. तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.58 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 25 हजार 279 रुग्णांपैकी 2 लाख 11 हजार 588 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 227 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 464 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 81 हजार 714 रुग्णांपैकी 1 लाख 72 हजार 506 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 579 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 629 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 81 हजार 288 रुग्णांपैकी 1 लाख 69 हजार 841 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 675 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 772 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 98 हजार 584 रुग्णांपैकी 1 लाख 88 हजार 132 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 885 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 652 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 645 सातारा जिल्ह्यात 588, सोलापूर जिल्ह्यात 395, सांगली जिल्ह्यात 623 तर कोल्हापूर जिल्ह्यात 401 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 837 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 56, सातारा जिल्हयामध्ये 826, सोलापूर जिल्हयामध्ये 524, सांगली जिल्हयामध्ये 630 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 801 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 54 लाख 7 हजार 445 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 80 हजार 162 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप : दि. 9 ऑगस्ट, 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)