आज पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 967

Date:

पुणे विभागातील 18 लाख 33 हजार 316 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 19 लाख 3 हजार 475 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 17 : पुणे विभागातील 18 लाख 33 हजार 316 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 3 हजार 475 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 967 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 39 हजार 192 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.31 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 99 हजार 590 रुग्णांपैकी 10 लाख 72 हजार 860 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 329 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 401 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.57 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 30 हजार 798 रुग्णांपैकी 2 लाख 16 हजार 331 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 864 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 603 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 86 हजार 216 रुग्णांपैकी 1 लाख 76 हजार 411 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 121 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 684 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 85 हजार 580 रुग्णांपैकी 1 लाख 75 हजार 99 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 600 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 881 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 1 हजार 291 रुग्णांपैकी 1 लाख 92 हजार 615 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 53 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 623 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 582 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 643, सातारा जिल्ह्यात 569, सोलापूर जिल्ह्यात 558, सांगली जिल्ह्यात 519 तर कोल्हापूर जिल्ह्यात 293 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 2 हजार 875 आहे. पुणे जिल्हयामध्ये 873, सातारा जिल्हयामध्ये 181, सोलापूर जिल्हयामध्ये 550, सांगली जिल्हयामध्ये 658 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 613 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 41 लाख 42 हजार 793 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 3 हजार 475 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप :- दि. 16 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

धंगेकर, मग एकनाथ शिंदेंवरही कारवाईची मागणी करणार का? भाजप नेते पुष्कर तुळजापूरकरांचा सवाल!

अशोक खरात प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्यावरील कारवाईच्या मागणीला भाजपचे...

लग्नाचे आमिष दाखवून १४ महिलांचे शोषण केल्याचा आरोप; दुबईत लपलेल्या फरार आरोपीला भारतात आणले!

एका पीडितेकडून १८ लाख रुपये उकळल्याचा आरोप; महिलांचे खासगी...