पुणे विभागातील 18 लाख 17 हजार 350 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 18 लाख 86 हजार 860 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे, दि. 12 : पुणे विभागातील 18 लाख 17 हजार 350 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 86 हजार 860 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 30 हजार 629 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 38 हजार 881 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.32 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 95 हजार 192 रुग्णांपैकी 10 लाख 68 हजार 983 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 856 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 353 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.61 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 26 हजार 728 रुग्णांपैकी 2 लाख 13 हजार 640 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 584 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 504 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 82 हजार 886 रुग्णांपैकी 1 लाख 73 हजार 708 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 543 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 635 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 82 हजार 682 रुग्णांपैकी 1 लाख 71 हजार 499 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्य 6 हजार 376 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 807 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 99 हजार 372 रुग्णांपैकी 1 लाख 89 हजार 520 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 270 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 582 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 3 हजार 257 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 937, सातारा जिल्ह्यात 622, सोलापूर जिल्ह्यात 609, सांगली जिल्ह्यात 762 तर कोल्हापूर जिल्ह्यात 327 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 361 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1076, सातारा जिल्हयामध्ये 1140, सोलापूर जिल्हयामध्ये 590, सांगली जिल्हयामध्ये 821 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 734 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 37 लाख 42 हजार 318 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 86 हजार 860 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)