कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळणार: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

Date:

मुंबई, दि. २२ एप्रिल २०२२: महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही कंपन्यांतील कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळावा यासाठी तिन्ही कंपन्यांच्या संचालकांची (मा.सं.) समिती गठीत करून या कंत्राटी कामगारांना वयामध्ये सवलत व सरळसेवा भरतीकरिता पात्रता ठरविणेबाबतचा अभ्यास करून अहवाल सादर करतील. या अहवालाच्या आधारे सदर प्रश्नांवर सकारात्मक कारवाई करण्यात येईल, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

मुख्यालयाच्या प्रकाशगड सभागृहात तिन्ही कंपन्यांच्या कर्मचारी संघटनांसोबत झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. या बैठकीस महावितरणचे संचालक (मा. सं.) डॉ. नरेश गिते, महापारेषणचे संचालक (संचालन) श्री. अनिल कोलप व संचालक (मा.सं.) सुगत गमरे आणि महानिर्मितीचे संचालक (मा.सं.) डॉ. मानवेंद्र रामटेके उपस्थित होते. तीनही वीज कंपन्यांचा कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण करण्याचा शासनाचा विचार नाही. करोना काळात सर्वांनी चांगले केले असून या काळात जे वीजयोध्दे आपल्या प्राणास मुकले त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याबाबत जलदगतीने कारवाई करण्यात येईल. तिन्ही कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची रिक्तपदे दि. ३१ मे २०२२ पर्यन्त पदोन्नतीद्वारे भरण्यात यावे. तसेच कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी, असे निर्देश मा. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वीज बिल विधेयकाच्या विरोधात व त्या अनुषंगाने खाजगीकरणाच्या विरोधात २६ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देशही ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबीरा’ला पुण्यात आज प्रारंभ

आरोग्य सेवांच्या डिजिटल परिवर्तनाला गती पुणे : आरोग्य सेवांच्या डिजिटल...

राजू शेट्टींनी कोकणातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष...

निवडणूक आयोगाचा कारभार राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा: नसीम खान

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणी केली नाही तर...