Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोदी, शहा हे दोन विकणारे, व आदानी, अंबानी हे दोन विकत घेणाऱ्यांचे हे सरकार लोकशाहीला घातक -अरविंद शिंदे

Date:

पुणे-. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज पुणे सातारा रोड, भापकर पेट्रोल पंपाजवळ महागाई, बेरोजगारी व जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या GST च्या विरोधात प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, आबा बागुल,अविनाश बागवे,रजनी त्रिभुवन,नीता रजपूत,,ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, आदींची भाषणे झाली.  यावेळी नगरसेवक लता राजगुरू, अजित दरेकर, रविंद्र धंगेकर, सुजाता शेट्टी,रफिक शेख, वैशाली मराठे, अनिल सोंडकर, ब्लॉक अध्यक्ष सतिश पवार, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रदिप परदेशी, शोएब इनामदार, प्रविण करपे, उस्मान तांबोळी, बाळासाहेब दाभेकर, रमेश अय्यर, द. स. पोळेकर, सुजित यादव, नरेंद्र व्यवहारे, उमेश कंधारे, अविनाश गोतारणे, अनिल अहिर, रवि मोहिते, भरत सुराणा, परवेत तांबोळी, अनुसया गायकवाड, नंदा ढावरे, वैशाली रेड्डी, बेबी नाज, योगिता सुराना, रजिया बल्लार, स्वाती शिंदे, ताई कसबे, शानी नौशाद, राधिका मखामले, नलिनी दोरगे, सीमा महाडिक, अनिता धिमधिमे, अश्विनी गवारे, ज्योती परदेशी, नरसिंह आंदोली, दिपक ओव्हाळ, वाल्मिक जगताप, भगवान कडू, विश्वास दिघे, भरत सुराणा, स्वप्निल नाईक, मामा परदेशी, सादिक कुरेशी, अमित बागुल, प्रविण चव्हाण, आबा जगताप, अन्वर शेख, अविनाश अडसूळ, प्रकाश आरणे, बाळासाहेब प्रताप, बंडू नलावडे, सुरेश कांबळे, डॉ. अनुप बेगी, वाल्मिक जगताप, राजू शेख, आयुब पठाण, हेमंत राजभोज, विकी खन्ना, रॉर्बट डेव्हिड, सुनिल पंडित, रवि पाटोळे, अभिजीत महामुनी, सुरेश चौधरी, दत्ता पोळ, परवेज तांबोळी, हरिष यादव, रावसाहेब खवळे, बाळू कांबळे, केतन जाधव आदी उपस्थित होते.  

     यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, सीएनजी, पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढविले आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, आटा, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही GST लावला आहे. मोदी सरकारने GST तून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही GST लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही GST भरावा लागणार आहे. हे सरकार केवळ हम दो हमारे दो असून मोदी, शहा व आदानी, अंबानी दोन विकाणारे व दोन विकत घेणारे यांचे आहे. मागील ४५ वर्षातील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे. तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षाची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुण वर्गांचा तीव्र विरोध असून काँग्रेस पक्ष तरुणांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे.’’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रातील 700 मंदिरांत वस्त्रसंहिता,150 आणखी मंदिरांत नियम लागू होणार

नागपूर - महाराष्ट्रामध्ये 700 पेक्षा जास्त तर देशभरात...

राहुल गांधींचा ताफा अडवणे ही हुकुमशाही, मुलभूत अधिकारांवर घाला.

कर्नल सोफिया यांचा अपमान करणाऱ्या मंत्री विजय शाहांना तत्काळ...

“अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार” — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन करत...