पुणे-छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या निधीस शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगितीचा निर्णयाचा संभाजी ब्रिगेड कडून आम्ही जोरदार धिक्कार करतो असे ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.
शिंदे यांनी असे म्हटले आहेकी,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या नावाखाली पेशवाई आणायची आहे का.? असाच प्रश्न मनात पडतो आहे. कारण स्वराज्याचे ‘दुसरे छत्रपती’ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या संभाजीनगर नावाला विरोध?, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळ असणाऱ्या वढू-तूळापूर येथील शंभू स्मारकास विरोध? या सर्व विकास कामांच्या निधीला स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारची स्थगिती म्हणजे छत्रपतींचा सतत अवमान नाही का? ह्या गोष्टी मनाला सहन होत नाहीत. महाराष्ट्रातील तमाम शंभू प्रेमी, शिवप्रेमींच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.
मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने वढू-तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकासासाठी आपण निधी मंजूर केला होता. परंतु त्याला आता स्थगिती देण्यात आल्याची बातमी कानावर आली. महाराष्ट्रात सर्व निषेधार्य गोष्टी घडत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात असे काही घडू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाही. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आनादर, जात आहे ही सरकार प्रतिसुधाची भावना असू शकते. मात्र संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा… व महाराष्ट्रात यापुढे असे स्थगिती चे प्रकार घडू नयेत अन्यथा संभाजी ब्रिगेडला रस्त्यावर उतरावं लागेल हा संभाजी ब्रिगेडचा इशारा आहे.