गृहमंत्र्याचा राजीनामा हे राज्यसरकारला उशीरा सुचलेलं शहाणपण -प्रविण दरेकर

Date:

मुंबई दि.५ एप्रिल : राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा हे सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. असे असले तरी देर आये मगर दुरुस्त आये, आता मुख्यमंत्र्यांनी राजिनामा स्वीकारावा तसेच सचिन वाझे काय ओसामा बिन लादेन आहे का, असा प्रश्न विचारणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे आता वाझे प्रकरणी काय मत आहे, हेही त्यांनी स्पष्ट करावे, अशी खोचक प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर आज दिली.

न्यायालयाच्या आदेशाने गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआय करणार असल्याने अखेर त्यांना गृह मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रविण दरेकर म्हणाले की, ‘माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. डॉ.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर “15 दिवसांच्या आत सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करावा”, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला आदेश दिले आहेत. माननीय उच्च न्यायालयाने अतिशय कठोर पाऊल उचललं आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, या आदेशानंतर गृह मंत्र्यानी राजीनामा देणं हे “उशीरा सुचलेल शहाणपण आहे.” खरं तर परमबीर सिंग यांनी लिखित आरोप केल्यानंतर लगेच गृह मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. आता पितळ उघडं पडेल, या भीतीपोटी राजीनामा देण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

आम्ही पहिल्या दिवसापासुन राजीनाम्याची मागणी करत होतो. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणाऱ्या या कार्यकाळाचं सत्य बाहेर येईल. सीबीआय चौकशीत कशाप्रकारे हप्ताखोरी चालली होती ते देखील बाहेर येईल. काही लोकांनी सीबीआय चौकशी होऊ नये याकरता प्रयत्न केले. रश्मी शुक्लांचा अहवाल, परमबीर सिंग यांचं पत्र या गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे भासवण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला माननीय उच्च न्यायालयाने जोरदार उत्तर दिलं आहे. त्यामुळे संपुर्ण प्रकरणाची चौकशी होऊन ह्या प्रकरणाची सत्यता जनते समोर येणं अपेक्षित होते. परंतु या सरकारच्या बाबतीत “कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ”, म्हणजे आपलाच माणूस आपल्या पतनाला कारणीभूत आहे, हे सिध्द झाले आहे, असेही मत दरेकर यांनी व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“एका विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी देणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करणे होय.” – विकास पासलकर.

राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात संपन्न पुणे-समाजसेवकांचा गौरव,...

भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १,५०० विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप

पुणे-श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने क्रांतीसूर्य भाऊसाहेब रंगारी...

एका कॉलवर कोथरूडमधील पेन्शनराची आयुष्यभराची पुंजी लुटली; १.१० कोटींची फसवणूक

पुणे: शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत गब्बर होण्याचे आमिष...