पुणे-कोल्हापूरचे असले म्हणून काय झाले आता ते पुण्याचे त्यातही कोथरूड चे आमदार आहेत, खर्डेकर , मोहोळ अशा कार्यकर्त्यांत वावरलेले आणि आता पुन्हा मंत्री झालेले चंद्रकांत पाटील पुण्याच्या समस्यांना आणि त्यावर मात करणाऱ्या लक्षवेधीना वेळेवर अनुसरणार नाहीत तर कधी अनुसरणार ?तर कोथरूड चे आमदार असलेल्या या मंत्र्यांनी आज बरोब्बर पुण्याच्या वाहतुकीच्या समस्येची गंभीर दखल घेत , आपल्यामुळे , आपल्या ताफ्यामुळे गणेश भक्तांना आणि त्यात पोलिसांना हि तकलिब कशाला ? असा प्रश्न उपस्थित करत एका वाहतूक शाखेच्या पोलिसाच्या बाईकवरून पुण्यातील गणेश मंडळांचा फेरफटका मारून अस्सल पुणेरी बाणा .. दर्शवून दिला .

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यावरील गर्दी लक्षात घेऊन वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर मागे बसून पुण्यातील गणपतींचे दर्शन घेणे पसंत केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर भाऊ रंगारी गणपतीच्या प्राण प्रतिष्ठेसाठा करण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता त्यांना वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर बसून प्रवास केला.
