पुणे – ३४ व्या पुणे फेस्टिवलमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे आज दुपारी *अंतरंग-ती च्या प्रतिभेचे* हा तिच्या विविध रूपांचा व स्त्रीच्या अंतरंगातील भाव विश्वाला गायन, वादन आणि नृत्याच्या माध्यमातून उलगडणारा कार्यक्रम प्रेक्षकांची मन जिंकून गेला. तसेच ‘जिम पोरी झिम’ एक पारंपरिक सण, ‘खेळ मंगळागौरीचे’ सादर झाले. अवीट गोडीच्या गीतांचे लाइव्ह सादरीकरण सोबत पुण्यातील ५० महिला कलाकारांचा संच आपल्या पारंपारिक वेशभूषेत होता. त्याच्या साथीला प्रतिथयश गायिकांचा – वाद्यवृंदा होता.
रत्ना दहिवेलकर व अर्चना नार्वेकर यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. अजित कुमठेकर याचे मुख्य समन्वयक होते. एलिना इव्हेंट्स आणि मानिनी मंगळागौर ग्रुप यांनी हा कार्यक्रम सादर केला आहे. याचे प्रायोजक सोन रूपम, चैतन्य पराठा आणि गोखले किचन, अस्मि मोबाइल व माई मसाले हे होते.
लहान कन्या हळूहळू मोठी होत जाते व लग्नानंतर सासरी जाते याचे कल्पक चित्रण संगीत व नृत्यातून सादर करण्यात आले.