Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सूर्यास्तापर्यंतही झाले नाही मानाच्या सर्व गणपतींचे विसर्जन: ५ गणपतींनी घेतला ८ तासाहून अधिक अवधी:कथा लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीची

Date:

पुणे- आज अनंत चतुर्दशी, चंद्रोदय ६ वाजून १३ मिनिटांनी झाला तर ६.४१ वा. सूर्यास्ताची वेळ तोवर मानाच्या अवघ्या ५ गणपतींचे हि यंदा विसर्जन झाले नव्हते , ग्रामदैवत कसबा गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या दोन मंडळांचे विसर्जन झाले. दरम्यान केळकर, कुमठेकर आणि टिळक रस्त्यावरूनही सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या नव्हत्या. सकाळी दहा वाजता राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला मंडई येथून प्रारंभ झाला. कसबा गणपती मार्गस्थ लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर गणेशभक्तांनी जल्लोषात स्वागत केले.कसबा गणपतीचे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास टिळक चौकात आगमन झाले. कसबा गणपतीचे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गणपतीचे विसर्जन करण्यात आले. जवळपास ६ तासानंतर विसर्जन करण्यात आले. यंदा मानाच्या गणपतींनी लवकर मिरवणूक काढू, असे आश्वासन दिले होते. परंतु, उलट यंदा उशीर लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानाच्या पहिल्या पाच गणपतींचे विसर्जनाचा वेळ खूपच लांबले आहे.आणि उद्या सकाळी १० वाजेपर्यंत मिरवणूक संपण्याची चिन्हे मावळत आहेत सबा गणपती टिळक चौकात (अलका चौक) दुपारी ३ वाजता आला. या गणपती समोर आर्ट आफ लिव्हिंगचे आरोग्यदायी पथक, कामायनीचे पथक, कलावंत ढोल ताशा पथक, रूजगर्जना पथक, प्रभात स्वर यांनी आपली सेवा बजावली. दरम्यान टिळक चौकात राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने चौकात भलीमोठी रांगोळी काढण्यात आली होती. कसबा गणपती टिळक चौकात आल्यानंतर त्यांचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

मानाचा दुसरा कसबा गणपती मंडळाचे दिमाखात आगमन झाले. मात्र सायंकाळी साडे पाच वाजेपर्यत अवघ्या दोन गणपती मंडळांचे विसर्जन झाल्याने मानाच्या गणपती विसर्जन मिरवणूक उशिरा संपणार हे स्पष्ट झाले. मानाचे गणपती लक्ष्मी रस्त्यावरून जाणार असल्याने लाखो पुणेकरांनी टिळक चौकात गर्दी केली आहे.परदेशी नागरिकांचा मिरवणुकीतीस सहभागही लक्षणीय ठरला. केळकर कुमठेकर रस्त्यासह कर्वे रस्ता आणि टिळक रस्त्यावरील मिरवणूक अद्याप सुरू झालेली नाही. शास्त्री रस्त्यावरून काही लहान मंडळांच्या मिरवणुका सुरू आहेत. मानाच्या गणपतींचे विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर लक्ष्मी रस्ता टिळकक रस्ता आणि केळकर तसेच कुमठेकर रस्त्यावरून मोठ्या मंडळांच्या मिरवणुका निघणार आहेत.  विद्युत रोषणाई आणि भव्यदिव्य देखावे तसेच स्पीकर्सच्या भिंती या मार्गावरून येणाऱ्या मंडळांची वैशिष्ट्ये आहेत.

दोन वर्षांनंतर भाविकांमध्ये उत्साह

गणेश मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात ढोल ताशा पथके, बँड पथके, जनजागृतीचे रथ, कला सादर करणारी पथके समाविष्ट झाल्याने मिरवणुकीचा वेळ वाढत असल्याचे दिसून येत आहे.पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचे निर्बंध गणेश मंडळांना अथवा ढोल ताशा पथकांना नसल्याने मनसोक्त पध्दतीने मिरवणुक सुरु असल्याचे चित्र मुख्य मिरवणुक मार्गावर दिसून येत आहे. कोरोनाच्या संकटामुळे 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा प्रथमच धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यास राज्यसरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे अभूतपूर्व गर्दी पुण्यातील गणेशोत्सवाच्या विर्सजन मिरवणुकीत दिसून येत आहे. पुण्यासह राज्यभरातील आणि देशातील विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाले आहे. याशिवाय विशेष बाब म्हणजे परदेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात संख्या पारंपारिक भारतीय वेशभूषेत दिसून येत आहे. यासोबतच मानाचा पहिला कसबा गणपतीच्या मिरवणुकीत कलावंत पथक सहभागी झाले. यात अभिनेता सिध्दार्थ जाधव, अभिनेत्री श्रृती मराठे, अभिनेत्री तेजस्वीनी पंडित, अभिनेत्री पल्लवी पाटील,अभिनेत्री अनिता दाते-केळकर,अभिनेता कश्यप परुळकर सहभागी झाले होते.पुण्यातील गणेश विर्सजन मिरवणुकीचा बंदोबस्त सांभाळणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. अशावेळी अनुभवी,गणेश मंडळांशी समन्वय असणारे पोलिस अधिकारी प्रत्यक्ष विर्सजन मिरवणुकीवर असणे महत्वपूर्ण समजले जाते. मात्र, यंदाच्या विर्सजन मिरवणुकीत पोलिसांचे नियोजन फसल्याचे पदोपदी जाणवत आहे. मिरवणुक सुरू होणाऱ्या मार्गावरील प्रमुख बेलबाग चौकात गर्दी वाढूनही ढोल ताशा पथके पुढे हलविणारी यंत्रणा दिसून आली नाही. मनमानी पध्दतीने वादनात वेळ वाया घालवणाऱ्यांवर कारवाई होतांना दिसून आली नाही.टिळक चौकात कुठेही बॅरिकेटिंग नाही की दोऱ्या बांधण्यात आलेल्या नसल्याने नागरिक कुठेही शिरत आहे. दरम्यान, मिरवणुकीच्या पथकातील सदस्यांना मनस्ताप देखील झाला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चऱ्होली आणि माण ई- बस डेपोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांना उत्तम वाहतूक सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेदापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

पुणे, दि. 25: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या...