पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालय उद्घाटन कार्यक्रम. सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रतिक्रिया….
शहराध्यक्ष जगताप यांचा अती उत्साह पुणेकरांच्या अंगलट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहता पुणे शहरातून करोना हद्दपार झाला आहे, असा समज राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा झालेला दिसतोय. पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना १४ दिवस होम क्वारंटाईन केले पाहिजे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार जाहीर कार्यक्रमात सकाळी करतात. संध्याकाळी त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्ष जगताप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी अशा पद्धतीने गर्दी जमवितात. हा प्रकार म्हणजे ‘तुम्ही काहीही बोला पण मला वाटेल तेच मी करणार’, असे वागण्याचाच प्रकार आहे. ही गर्दी पाहून अजितदादांना जाहीर माफी मागावी लागली. तसेच आयोजकांवर कारवाई करण्याचे आश्वासन द्यावे लागले, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय? राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जगताप यांनी केलेल्या चुकीची शिक्षा पुणेकरांना भोगावी लागणार आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महापालिका