जनहित याचिकेवर खर्च ठराव सभागृह नेते गणेश बिडकर यांची भूमिका…
पुणे –
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत जनहित याचिकेवर बाजू मांडण्यासाठी खर्च करण्याचा जो ठराव मंजूर झाला तो ठराव भारतीय जनता पक्षाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेबाबत नाही. पीएमआरडीए च्या विकास आराखड्याबाबत (डीपी) भाजपचे नगरसेवक दीपक पोटे आणि अन्य काही सभासदांनी जी याचिका दाखल केलेली आहे. त्याचा संपूर्ण खर्च हा भाजपच करणार असून या ठरावाशी त्याचा काहीही संबंध नाही. पालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयात स्वयंसेवी संस्थांच्या वतीने जे दावे तसेच जनहित याचिका दाखल केल्या जातात. त्यामध्ये महापालिकेला पार्टी केल्यास अशा प्रकरणांमध्ये पालिकेची बाजू मांडण्यासाठी वकिलाची नेमणूक करून त्यासाठी येणारा खर्च पालिकेने करावा, अशा आशयाचा ठराव मंगळवारी स्थायी समितीने मान्य केलेला. भाजपने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा याच्याशी काहीही संबंध नाही.
- गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका