पुणे-भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “मी आज गणरायाचे धन्यवाद मानतो. गेल्या वर्षी गणरायाला निरोप देताना मी तुरूंगात जात होतो. आज संपूर्ण महाराष्ट्र तुरूंगात बाहेर आला आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले. गेल्या अडीच तीन वर्षात महाराष्ट्र जो मागे गेलाय त्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्याची शक्ती दे असंही गणराया चरणी म्हटल्याचं ते म्हणाले.
“ज्यावेळी ठाकरे सरकार गेलं त्यावेळी महाराष्ट्रावरील विघ्न टळलं. आपल्या माफिया सरकारला आता महाराष्ट्राच्या जनतेनं कायमसाठी रवाना केलंय. तुमचा उजवा हात तुरुंगात गेलाय आता डावा हातही जाईल. उद्धव ठाकरे तुम्ही आता पोराचीही काळजी करा,” असंही ते सोमय्या म्हणाले.
“पालिकेने आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने मढ मार्वेतील १ कोटींच्या स्टुडिओ घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा केली आहे. त्यात पर्यावरण मंत्रालयानं गैर कायदेशीररित्या १ हजार कोटींचा घोटाळा केलाय हे सिद्ध होणार. म्हणून ठाकरेंनी स्वताच्या मंगलाची काळजी करावी,” असंही त्यांनी नमूद केलं. सद्या मला ठाकरे कुटुंबीयांची काळजी घेऊ द्या. उजवा हात तुरूंगात गेला आहे. डावा आता मार्गावर असल्याचंही त्यांनी सांगितलं.