मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देहूगावात स्वच्छता अभियान
स्वच्छता अभियानातून जमा केला दोन टन कचरा
पिंपरी / प्रतिनिधी:
मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरीटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पावन भूमी तीर्थक्षेत्र देहूगाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी इंद्रायणी नदीपरिसरही स्वच्छ करण्यात आला.
तुकाराम महाराजांचे दर्शन घेवून देहुगावच्या सरपंच सुनीता टिळेकर यांच्या हस्ते या अभियानास सुरुवात करण्यात आली. गाथा मंदिर रोड, नदीघाट परिसरात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये सुमारे दोन टन कचरा जमा करण्यात आला. यावेळी देहूगाव ग्रामपंचायत सदस्य हेमाताई काळोखे, उपसरपंच संतोष हगवणे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष गोपाळ माळेकर, माधव मनोरे, नितीन चिलवंत, नामदेव पवार, माजी ग्रामपंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळोखे, सुनील हगवणे, सोमनाथ मुसुडगे, अंकुश मुसुडगे, अहिल्यादेवी फौंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर, अॅड. महेश घोडके, गोविंद दुधभाते, केरबा वाघमोडे, बिरप्पा घोडके, सतीश कागे, श्रीयश गाडेकर, केरबा वाघमोडे, बिरप्पा घोडके, सतीश कागे, श्रीयश गाडेकर, ज्ञानेश्वर खोसे , सोमनाथ मासुडगे, नीलकंठ शिडोले, प्रेमदास राठोड, प्रसाद खारकर, संतोष जगताप, अमोल गोरे, विष्णु माडीवर, संतोष घोडके , मोहन जाधव, सुनील आरे, दत्ता अस्वले आदी मान्यवर उपस्थित होते.
हेमाताई काळोखे म्हणाल्या, देहू ही संतांची भूमी आहे. त्यामुळे मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टने केलेले स्वच्छता अभियान स्तुत्य उपक्रम आहे.
माधव मनोरे म्हणाले, सामाजिक भान ठेवून पर्यावरण समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक कार्य करणे, ही काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेवून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पावनभूमीमध्ये स्वच्छता अभियान घेतले आणि इंद्रायणी नदी परिसर स्वच्छ केला. यामध्ये तब्बल दोन टन कचरा जमा झाला. देहू नगरी स्वच्छ झाली आहे. तुकोबारायांनी प्रत्यक्ष त्यांच्या विचारधारेतून माणूस घडविला. त्यांच्या या अतुलनीय कार्यात आपण कितीही कार्य केले, तरी कमीच आहे. मात्र, दर महिन्याला येथे स्वच्छता अभियान राबवून पर्यावरण रक्षणाचे कार्य करु, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केशव अहिवळे यांनी केले. तर आभार अहिल्यादेवी होळकर फौंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी मानले.