बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. ही बातमी कळल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय म्हणतो.. सुशांतच्या आत्महत्येची बातमी मन सून्न करणारी आहे. या बातमीमुळे धक्का बसला. मी काय बोलू? शब्दच फुटत नाहीत. मला आठवतंय सुशांतचा छिछोरे सिनेमा पाहिला आणि माझा मित्र साजिद याला फोन करुन सांगितलं की मला हा सिनेमा पाहताना किती मजा आली. मी देखील या सिनेमात असतो तर मजा आली असती. एका गुणी अभिनेत्याचा शेवट झाला. त्याच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो असं अभिनेता अक्षय कुमारने म्हटलं आहे.बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. आज त्याने आत्महत्या केल्यानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आपल्याला हा धक्का न सहन होणारा आहे असं अभिनेता अक्षय कुमारने म्हटलं आहे.