पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेश चिटणीस तथा हवेली पं.स.चे माजी सदस्य सुनिल खेडेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंध बांधून खेडेकर यांचे सेनेत स्वागत केले. राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण आदींसह सर्व नेत्यांची उपस्थिती होती. धनकवडीसह दक्षिण पुण्यात एक वजनदार राजकारणी म्हणून ओळख असलेले खेडेकर हे पंचवीस वर्षांपासून राजकारणात असून ग्रा.पं. सदस्य, उपसरपंच व पुढे हवेली पं.स.चे ते सदस्य म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षाचे काम करत होते. मात्र गेली काही वर्षे त्यांना विचारात घेतले जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये असंतोष व खदखद होती. खेडेकर हे राष्ट्रवादीला रामराम ठोकतील,अशी चर्चा गेली अनेक दिवस धनकवडी भागात होती. शेवटी त्यांनी भगवा हातात घेत सेनेलाच पसंती दिली. खेडेकर यांच्या शिवसेना प्रवेशाने धनकवडी भागातील राजकीय समिकरणेच बदलणार असून आगामी महापालिका निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटतील.
राष्ट्रवादी काॅग्रेसचे प्रदेश चिटणीस सुनिल खेडेकर शिवसेनेत
Date: