पुणे- दक्षिण भारतांतील सर्वात लोकप्रिय आणि बहुप्रतिष्ठित रॅली मारूती सुझुकी दक्षिण डेअर या रॅलीच्या 9व्या मालिकेत अल्टीमेट कार्स गटात टीम मारूती सुझुकीच्या सुरेश राणा आणि आश्विन नाईक यांनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. तर, अल्टीमेट बाईक्स गटात टी नटराज याने विजेतेपद पटकावले.
संपूर्णपणे नव्या मार्गाचे आव्हान स्वीकारणाऱ्या नव्या रॅलीतील स्पर्धकांना चित्रदुर्ग आणि बेळगाव या दक्षिण भारतातही आव्हानात्मक निसर्गाचा अनुभव मिळाला. त्यांनंतर प्रथमच पश्चिम भारतात कोल्हापूर मार्गे प्रवेश करताना त्यांनी पुणे येथे अंतिम रेषा ओलांडली. त्याआधी गेल्या रविवारी बंगळूर येथे सुरु झालेल्या सहा दिवसीय या रॅलीत 180 स्पर्धकांनी 2000किलोमीटरचे अंतर कापून अजिंक्यपदासाठी आपले कौशल्य पणाला लावले.
या रॅलीच्या यशाबाबद्दल बोलताना मारुती सुझुकीच्या विपणन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष तरुण दुर्ग म्हणाले कि, गेल्या 9 वर्षापासून दक्षिण डेअर रॅलीने भरघोस यश मिळवले असून दक्षिण भारतात पाय रोवले आहेत. देशातल्या सर्वाधिक अंतराच्या रॅलीत सर्वाधिक स्पर्धकांचा सहभाग हा त्याचा पुरावा आहे. तसेच रॅलीच्या विविध ठिकाणी मिळालेला प्रतिसाद हा या स्पर्धेच्या लोकप्रियतेची पावती आहे.
स्पर्धेत अल्टीमेट कार्स गटात टीम मारूती सुझुकीच्या सुरेश राणा व आश्विन नाईक यांनी ग्रँड विटारा ब्रेझा कार चालवत 10तास 11 मिनिटे 26 सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. तर, सम्राट यादव व एस.एन.निझामी यांनी दुसरा व संदीप शर्मा व करण आर्या यांनी तिसरा क्रमांक पटकावला. यावेळी विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करतांना सुरेश राणा याने सांगितले कि, मारुती सुझुकी दक्षिण डेअर रॅलीचे आमचे सलग दुसरे विजेतेपद आहे. नव्या आणि आव्हानात्मक मार्गाने जाताना वाहनाबरोबर सामंजस्य राखणे अतिशय महत्वाचे असते. यावर्षी नव्याने सहभागी होणाऱ्यांसाठी हि रॅली अधिक आव्हानात्मक होती.
अल्टीमेट बाईक्स गटात टी नटराज याने 6तास 12 मिनिटे 38 सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. अब्दुल वाहिद व संजय कुमार यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. एन्ड्युरन्स कार्स(टीएसडी)गटात सुबीर रॉय व निरव मेहता यांनी स्विफ्ट गाडी चालवत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. कार्तिक मारूती व शंकर एस आनंदने एस क्रॉस गाडी चालवत दुसरा क्रमांक पटकावला. रघु नंदन व प्रकाश एम यांनी तिसरा क्रमांक पटकवला.
स्पर्धेचा सविस्तर निकालः प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसारः
अल्टीमेट कार्स्ः 1. सुरेश राणा व आश्विन नाईक(10ः11ः26से); 2. सम्राट यादव व एस.एन.निझामी(10ः14ः52से), 3. संदीप शर्मा व करण आर्या(10ः24ः17से);
अल्टीमेट बाईक्स्ः 1. टी नटराज(06ः12ः38से), 2. अब्दुल वाहिद(06ः15ः37से), 3.संजय कुमार(06ः26ः53से);
एन्ड्युरन्स कार्स्(टीएसडी)ः 1.सुबीर रॉय व निरव मेहता(00ः12ः20से), 2.कार्तिक मारूती व शंकर एस आनंद(00ः12ः45से); 3. रघु नंदन व प्रकाश एम(00ः12ः49से);