पुणे- आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ 14व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2017-18 स्पर्धेत कॅपजेमिनी, अॅमडॉक्स व टेक महिंद्रा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पुना क्लब क्रिकेट मौदान व पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत फनेंद्र पाईलाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कॅपजेमिनी संघाने व्हेरीटास संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना दिपक कुमार, फनेंद्र पाईला व अंकुश महासाहेब यांच्या आचूक गोलंदाजीपुढे व्हेरीटास संघ तीन चेंडू बाकी असताना सर्वबाद 90 धावांत गारद झाला. 90 धावांचे लक्ष गिरीष बोराच्या नाबाद 46 तर फनेंद्र पाईलाच्या नाबाद 23 धावांच्या बळावर कॅपजेमिनी संघाने केवळ 15 षटकात 4 बाद 91 धावांसह सहज पुर्ण केले. फनेंद्र पाईला सामनावीर ठरला.
दुस-या सामन्यात रोहित लालवानीच्या नाबाद 70 धावांच्या बळावर अॅमडॉक्स संघाने सनगार्ड एएस/एफआयएस संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रशांत पोळच्या 42 व रोहित भाटीयाच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सनगार्ड एएस/एफआयएस संघाने 20 षटकात 8 बाद 154 धावा केल्या. 154 धावांचे लक्ष अॅमडॉक्स संघाने चार चेंडू बाकी असताना 3 बाद 155 धावांसह पुर्ण केले. यात निखिल पेंढारकरने 43 धावा करून रोहितला सुरेख साथ दिली. रोहित लालवानी सामनावीर ठरला.
पुढच्या लढतीत सचिन पिंपरीकरच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर टेक महिंद्रा संघाने केपीआयटी संघाचा 15 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टेक महिंद्रा संघाने 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या. 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केपीआयटी संघाचा डाव 20 षटकात 6 बाद 137 धावांत थांबला. महिंद्रा संघाकडून गुरप्रीत सिंगने 16 धावात 3 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. सचिन पिंपरीकर सामनावीर ठरला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
व्हेरीटास- 18.3 षटकात सर्वबाद 90 धावा(रणवीर मानकु 27, दिपक कुमार 3-11, फनेंद्र पाईला 2-22, अंकुश महासाहेब 2-8) पराभूत वि कॅपजेमिनी- 15 षटकात 4 बाद 91 धावा(गिरीष बोरा नाबाद 46, फनेंद्र पाईला नाबाद 23, सुमित दिघे 3-24) सामनावीर- फनेंद्र पाईला
कॅपजेमिनी संघाने 6 गडी राखून सामना जिंकला.
सनगार्ड एएस/एफआयएस- 20 षटकात 8 बाद 154 धावा(प्रशांत पोळ 42, रोहित भाटीया 50, भावनीश कोहली 2-23, प्रविण खालको 2-40, आदित्य वर्मा 2-8) पराभूत वि अॅमडॉक्स- 18.2 षटकात 3 बाद 155 धावा(रोहित लालवानी नाबाद 70, निखिल पेंढारकर 43, अविराज जैन 21) सामनावीर- रोहित लालवानी
अॅमडॉक्स संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
टेक महिंद्रा- 20 षटकात 7 बाद 152 धावा(सचिन पिंपरीकर 57, विजय मुरली 21, मयुरेश लिक्कीते 2-15, निरंजन फडणवीस 3-27) वि.वि केपीआयटी- 20 षटकात 6 बाद 137 धावा(नागराज अलोके 28, तुषार वैगणकर 26, प्रफुल्ल घाडी 23, कमलेश सुर्वे 24, गुरप्रीत सिंग 3-16) सामनावीर- सचिन पिंपरीकर
टेक महिंद्रा संघाने 15 धावांनी सामना जिंकला.