सर्वज्ञ सरोदे, नील बोन्द्रे, शौर्य गदादे यांचे विजय

Date:

पुणे, 6 फेबुवारी 2021: प्रविण झिटे यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व आयकॉन यांच्या संलग्नतेने आयोजित 8,10,  वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पहिल्या पीएमडीटीए-आयकॉन लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2021  स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात सर्वज्ञ सरोदे, नील बोन्द्रे, शौर्य गदादे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा  पराभव करून आगेकूच केली. 

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत अव्वल मानांकित सर्वज्ञ सरोदे व सातव्या मानांकित शौर्य गदादे यांनी अनुक्रमे वेदांग गायकवाड व लव परदेशी यांचा 5-0 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. पुण्याच्या नील बोन्द्रे याने यशवंतराजे पवारचा 5-3 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. 8 वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित सारा फेंगसे हिने देवेशील पडियावर 5-1 असा सहज विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित श्रावि देवरेने रुद्रमा सिंगचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 8 वर्षाखालील मुले: पहिली फेरी :वीर गायकवाड वि.वि.शर्विल सस्ते 5-3;देव मूर्थी वि.वि.अहाण जैन 5-0;कबीर गुंडेचा वि.वि.अर्जित बावस्कर 5-1;यशवंतराजे पवार वि.वि.यश माने 5-1;
8 वर्षांखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:सारा फेंगसे(1) वि.वि.देवेशील पडिया 5-1;अनुष्का जोगळेकर(3) वि.वि.आयूशी तरंगे 3-0(सामना सोडून दिला);श्रावि देवरे(2) वि.वि.रुद्रमा सिंग 5-0.
10 वर्षाखालील मुले: दुसरी फेरी:सर्वज्ञ सरोदे(1) वि.वि.वेदांग गायकवाड 5-0;शौर्य गदादे(7) वि.वि.लव परदेशी 5-0;अयांश पॉल वि.वि.अवनीश परब 5-1;नील बोन्द्रे वि.वि.यशवंतराजे पवार 5-3.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वंदे भारत एक्स्प्रेसला आज सायंकाळी पुणे रेल्वे स्टेशनजवळ अपघात

कोच नं सी 15 रुळावरून घसरला पुणे-वंदे भारत एक्स्प्रेसला आज...

बुधवार पेठ भागातील कुंटणखान्यासाठी वापरण्यात आलेले फ्लॅट सिल: ३ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे-पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई करत अनैतिक मानवी...