एम 3 करंडक आंतरक्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत युनायटेड स्पोर्ट्स क्लब, डेक्कन जिमखाना, केडन्स, क्लब ऑफ महाराष्ट्र संघांची विजयी सलामी

Date:

पुणे, 19 जानेवारी 2021- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित एम 3 करंडक आंतर क्लब 23 वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत गटसाखळी फेरीत युनायटेड स्पोर्ट्स क्लब, डेक्कन जिमखाना, केडन्स क्रिकेट अकादमी आणि क्लब ऑफ महाराष्ट्र या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला. 
पीवायसी हिंदू जिमखाना,डेक्कन जिमखाना, डीव्हीसीए व पुना क्लब  मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत चुरशीच्या झालेल्या लढतीत संकेत यशवंती (4-31 व नाबाद  22) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने पीवायसी हिंदू जिमखाना संघाचा  1 गडी राखून  पराभव करत धडाकेबाज सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघ 38.1 षटकात 138 धावावर संपुष्टात आला. यात अखिलेश गवळी 28, अमेय भावे 23, यश माने 21, आदित्य डावरे 17 यांनी धावा केल्या. युनायटेड स्पोर्ट्स क्लबकडून संकेत यशवंतीने अचूक गोलंदाजी करत 31 धावात 4महत्वपूर्ण गडी बाद केले. संकेतला अद्वैय सिधये 12 धावात 2 गडी तर, आनंद ठेंगे(1-27), आदित्य मोरे(1-27) यांनी प्रत्येकी एक गडी बाद करून सुरेख साथ दिली. याच्या उत्तरात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 33.5षटकात 9बाद 139धावा करून हे आव्हान पूर्ण केले. सलामीची जोडी आदित्य राजहंस(22धावा) व अद्वैय शिधये(22धावा) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 47चेंडूत 48धावांची भागीदारी करून संघाला सुरेख सुरुवात करून दिली. हे दोघेही बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज फारशी मोठी खेळी करू शकले नाहीत. त्यानंतर संकेत यशवंती याने पुन्हा एकदा गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीतही कमाल दाखवत नाबाद 39चेंडूत 3चौकारांसह 22धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. सामन्याचा मानकरी संकेत यशवंती ठरला.  दुसऱ्या सामन्यात  अजय बोरुडे(3-34 व 32धावा) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने  अँबिशियस क्रिकेट अकादमीचा  4 गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना अँबिशियस क्रिकेट अकादमीचा डाव 45षटकात 211धावावर संपुष्टात आला. यात तनिश जैन याने धडाकेबाज फलंदाजी करताना 114चेंडूत 15चौकार व 1षटकारांच्या मदतीने 107धावांची शतकी खेळी केली. त्याला सिद्धांत दोशी 33, ऋषिकेश बारणे 18, व्यंकटेश दराडे 19यांनी धावा काढून सुरेख साथ दिली. डेक्कन जिमखाना संघाकडून अजय बोरुडे(3-34), यश बोरामणी(3-37), धीरज फटांगरे(2-38), प्रज्वल मुंगरे(1-37) यांनी भेदक गोलंदाजी केली. हे आव्हान डेक्कन जिमखाना संघाने 44षटकात 6बाद 214धावा करून पूर्ण केले. यामध्ये स्वप्निल फुलपगार 51, शुभांकर हर्डीकर नाबाद 36, यश बोरामणी 36, अजय बोरुडे 32, आत्मन पोरे नाबाद 23 यांनी धावा काढून संघाचा विजय सुकर केला. अष्टपैलू कामगिरी करणारा अजय बोरुडे सामन्याचा मानकरी ठरला. 
अन्य लढतीत इझान सय्यद(2-23) याने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर   केडन्स क्रिकेट अकादमी संघाने पूना क्लब संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजयी सुरुवात केली.  अतुल विटकर याने केलेल्या नाबाद 60 धावांच्या जोरावर  क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाचा  4गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली. 
स्पर्धेचे उदघाटन महादेव जाधव, नंदन ठाकूर आणि पीवायसी हिंदू जिमखानाच्या क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी क्रिकेटपटू अविनाश जाधव, पाथ-वे फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजीत जाधव, 19 वर्षाखालील भारतीय संघातील माजी खेळाडू काशिनाथ खडकीकर आणि  पाथ-वे फाउंडेशन सचिव सिद्धार्थ निवसरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: गटसाखळी फेरी:
पीवायसी क्रिकेट मैदान: पीवायसी हिंदू जिमखाना: 38.1 षटकात सर्वबाद 138 धावा(अखिलेश गवळी 28(40,4×4), अमेय भावे 23(32,2×4,1×6), यश माने 21(33,1×4,1×6), आदित्य डावरे 17, संकेत यशवंती 4-31, अद्वैय सिधये 2-12, आनंद ठेंगे 1-27, आदित्य मोरे 1-27) पराभूत वि.युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 33.5षटकात 9बाद 139धावा(आदित्य राजहंस 22(49,3×4,1×6), अद्वैय शिधये 22(20,4×4), महेश मस्के 26(29,3×4,1×6), संकेत यशवंती नाबाद 22(39,3×4), यश खळदकर 4-21, यश माने 2-11, साहिल चुरी 1-25, आदित्य डावरे 1-29);सामनावीर-संकेत यशवंती; युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघ 1 गडी राखून विजयी;
डेक्कन जिमखाना मैदान: अँबिशियस क्रिकेट अकादमी: 45षटकात सर्वबाद 211धावा(तनिश जैन 107(114,15×4,1×6), सिद्धांत दोशी 33(52,5×4), ऋषिकेश बारणे 18, व्यंकटेश दराडे 19, अजय बोरुडे 3-34, यश बोरामणी 3-37, धीरज फतंगरे 2-38, प्रज्वल मुंगरे 1-37) पराभूत वि.डेक्कन जिमखाना: 44षटकात 6बाद 214धावा(स्वप्निल फुलपगार 51(46,6×4), शुभांकर हर्डीकर नाबाद 36(57,2×4,1×6), यश बोरामणी 36(66,3×4), अजय बोरुडे 32(32,4×4,1×6), आत्मन पोरे नाबाद 23(27,2×4), तनिश जैन 3-32, वैभव विभुते 1-43, सरिश देसाई 1-36, व्यंकटेश दराडे 1-14);सामनावीर-अजय बोरुडे; डेक्कन जिमखाना 4 गडी राखून विजयी;  
डीव्हीसीए मैदान: व्हेरॉक क्रिकेट अकादमी:31.3 षटकात सर्वबाद 149 धावा(मिझान सय्यद 46(57,5×4), ओंकार राजपूत 26(29,1×4,2×6), तिलक जाधव 26(43,4×4), सौरभ नवले 13, प्रज्वल गुंड 3-46, वैभव गोसावी 2-28, राजवर्धन उंडरे 2-5, अतुल विटकर 1-15) पराभूत वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 31.3lषटकात 6बाद 152धावा(राजवर्धन उंडरे 38(63,4×4,1×6), अतुल विटकर नाबाद 60(55,9×4, 1×6), यश क्षिरसागर 19(30,3×4), अद्वैत मुळ्ये 15, ओंकार राजपूत 2-7, राहुल वारे 2-25, मनोज यादव 1-14);सामनावीर-अतुल विटकर; क्लब ऑफ महाराष्ट्र संघ 4गडी राखून विजयी;

पूना क्लब मैदान: पूना क्लब: 40षटकात 9बाद 178धावा(आर्यन गाडगीळ 30(49,3×4), वरद कुलकर्णी 22(52,2×4), सागर मलपती 22(22,1×4,2×6), राजकुमार चौहान 17, अक्षय खोपडे 18, कन्हैया लड्डा 14, आर्य जाधव 3-49, इझान सय्यद 2-23,सिद्धेश वरघंटी 2-50) पराभूत वि.केडन्स क्रिकेट अकादमी: 26.5 षटकात 4बाद 180धावा(हर्षल काटे नाबाद 50(48,5×4,1×6), कौशल तांबे नाबाद 53(46,8×4), अथर्व काळे 32(21,4×4,2×6), अर्शीन कुलकर्णी 18, विशाल गायकवाड 2-33, राजकुमार चौहान 1-34, अमेय मुजुमदार 1-55);सामनावीर-इझान सय्यद ; केडन्स क्रिकेट अकादमी 6 गडी राखून विजयी. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....