तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत भारताच्या प्रजनेश गुन्नेस्वरनचा दुस-या फेरीत प्रवेश

Date:

  • भारताच्या रामकुमार रामनाथन, अर्जुन कढे यांचे आव्हान संपुष्टात 
 
पुणे-  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत इटलीच्या सातव्या मानांकीत साल्वाटोर कारुसो याने भारताच्या  रामकुमार रामनाथनाथनचा तर झेकियाच्या जिरी वेस्ली याने अर्जुन कढेचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.  
 
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 1 तास 38 मिनिट चाललेल्या सामन्यात 
राष्ट्रीय क्रमांक एक व जागतिक क्रमांक 122 असलेल्या भारताच्या 3o वर्षीय प्रजनेश गुन्नेस्वरन याने संघर्षपुर्ण लढतीत जागतिक क्रमांक 131 असलेल्या जर्मनीच्या 30 वर्षीय  यॅनिक मॅडेन याचा  7-6(4), 7-6(5) असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये सहाव्या गेमअखेर ३-३ असा बरोबरीत सामना असताना प्रजनेशने आठव्या प्रजनेशने   यॅनिकची सर्व्हिस ब्रेक केली.मात्र पुढच्याच नवव्या गेममध्ये  यॅनिकने प्रजनेशची सर्व्हेिस ब्रेक करत पुन्हा सामना बरोबरीत आणला,. बाराव्या गेमअंती सामना 6-6 असा बरोबरी आल्याने टायब्रेक मध्ये गेला. टायब्रेकमध्ये प्रजनेशने आक्रमक पवित्रा घेत टायब्रेक जिंकून पहिला सेट  7-6(4) असा जिंकून घेतला. दुसरा सेटही संघर्षपुर्ण झाला. प्रजनेशने आपल्या खेळात सातत्य राखत दुस-या सेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. दुसरा सेटही बाराव्या गेमपर्यंत ६-६ असा बरोबरीत झाल्याने टायब्रेक झाला. प्रजनेशने दुसरा सेट टायब्रेकमध्ये  7-6(5)  असा जिंकत सामन्यात विजयासह दुस-या फेरीत प्रवेश केला.  
2 तास 24 मिनिट चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमांक 182 असलोल्या भारताच्या 25 वर्षीय रामकुमार रामनाथनचा जागतिक क्रमांक 98 असलेल्या 27 वर्षीय इटलीच्या सातव्या मानांकीत साल्वाटोर कारुसो याने  3-6,6-4,7-5 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. रामनाथनने पहिला सेट  3-6 असा जिंकल्यानंतर  साल्वाटोर कारुसो याने पुर्ण क्षमतेनिशी खेळत दुसरा व तीसरा सेट अनुक्रमे  6-4,7-5 असे जिंकत सामन्यात विजय मिळवला. 
 
1 तास 24 मिनिट चाललेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकीत  जेम्स डकवर्थ याने  जर्मनीच्या  पीटर गोजोझिक याचा  7-6(5), 6-4 असा टायब्रेकमध्ये पराभव करत स्पर्धेच्या दुस-या फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमांक 96 असलेल्या 28 वर्षीय जेम्सने पहिल्या सेटमध्ये सावकाश सुरूवात केली. बाराव्या गेमपर्यंत सामना 6-6 असा बरोबरीत राहिल्याने सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्येही जागतिक क्रमांक 106 असलेल्या 30 वर्षीय पीटरने चांगली झुंज दिली. मात्र  जेम्सने 7-6(5) असा सेट जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये चौथ्या गेमपर्यंत सामना 2-2 असा बरोबरीत असताना पाचव्या गेममध्ये  जेम्सने पीटरची सर्व्हिस ब्रेक करत सामन्यात 3-2 अशी आघाडी घेतली. सहाव्या आठव्या व दहाव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत 6-4 असा सेट जिंकत सामन्यात विजय मिळवला. 
 
पुण्याचा वाईल्ड कार्ड प्राप्त 26 वर्षाय जागतिक क्रमांक 612 असलेला अर्जुन कढेचा झेकियाच्या 26 वर्षीय जागतिक क्रमांक 107 असलेल्या जिरी वेस्ली याने  6-2,6-4 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये  जिरीने अर्जुनची सर्व्हिस ब्रेक करत अर्जुनवर दबाव निर्माण केला. चौथ्या गेमपर्यंत जिरीने 3-1 अशी आघाडी घेत पाचव्या गेममध्ये पुन्हा अर्जुनची सर्व्हिस ब्रेक करत 4-1 अशी भक्कम आघाडी घेतली. सहाव्या व आठव्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत जिरीने पहिला सेट 6-2 असा खिशात घतला. दुस-या सेटमध्येही पहिल्याच गेममध्ये जिरीने अर्जुनची सर्व्हिस ब्रेक करत 1-0 अशी आघाडी घेतली.  पुढे दहाव्या गेमपर्यंत जिरीने स्वतःची सर्व्हिस राखत दुसरा सेट  6-4 असा जिंकत. सामना  6-2,6-4 असा जिंकून दुस-या फेरीत प्रवेश केला. 
 
आठव्या मानांकीत  बेलारूसच्या एगोर गेरासीमोव्ह याने इटलीच्या पाओलो लोरेन्झी याचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. तर इटलीच्या रॉबर्टो मार्कोराने  झेकियाच्या  लुकास रोझोल याचा 6-3, 6-2 असा सहज पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. 
सर्बियाच्या निकोला मिलोजेव्हिक याने फ्रान्सच्या अँटोइन होआंग याचा 7-6(5), 6-4 असा तर बेलारूसच्या  इल्या इवाश्का याने रशियाच्या  एव्हजेनी डॉन्स्कोय याचा 6-3, 6-2 असा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- पहिली फेरी  
साल्वाटोर कारुसो (इटली)(7)वि.वि रामकुमार रामनाथन(भारत) 3-6,6-4,7-5
जेम्स डकवर्थ (ऑस्ट्रेलिया)(6)वि.वि पीटर गोजोझिक (जर्मनी) 7-6(5), 6-4
जिरी वेस्ली (झेकिया) वि.वि अर्जुन कढे (भारत) 6-2, 6-4
प्रजनेश गुन्नेस्वरन(भारत) वि.वि  यॅनिक मॅडेन(जर्मनी) 7-6(4), 7-6(5)
एगोर गेरासीमोव्ह (बेलारूस)(8) वि.वि पाओलो लोरेन्झी (इटली) 6-2, 6-3

रॉबर्टो मार्कोरा (इटली)  वि.वि लुकास रोझोल (झेकिया) 6-3, 6-2
निकोला मिलोजेव्हिक (सर्बिया)  वि.वि  अँटोइन होआंग (फ्रान्स)7-6(5), 6-4
इल्या इवाश्का (बेलारूस)  वि.वि   एव्हजेनी डॉन्स्कोय (रशिया) 6-3, 6-2

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन व कृषी विभाग अॅक्टिव्ह मोडवर

खरीप हंगाम २०२६-२७ आढावा बैठक व राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न पुणे,...

एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम २०२६ साठी सूक्ष्म नियोजनावर भर द्या-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

खरीप हंगाम २०२६ च्या नियोजनसंदर्भात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न शेतकऱ्यांना खते-बियाणे...

आज सूरत, उद्या मुंबई-पुणे?:गुजरातमधील परिस्थितीवरून रोहिणी खडसे आक्रमक; सूरतमधील गॅस टंचाईचा महाराष्ट्राला इशारा

मुंबई-गुजरातमधील सूरत शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या गंभीर परिस्थितीचा...

बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या आधारे उंच इमारती उभारल्या- शिवसेनेचा आरोप

पुणे- शहरात काही महापालिकेच्या वर्षापूर्वी बोगस गुंठेवारी दाखल्याचे प्रकरण...