पहिल्या पीवायसी-बीकेटी निमंत्रित निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत पाच आंतरराष्ट्रीय मास्टर्स सहभागी
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना ययांच्या वतीने आयोजित पहिल्या पीवायसी-बीकेटी निमंत्रित निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत मानांकित खेळाडूंमध्ये आयएम समेद शेटे(2398), आयएम विक्रमादीत्या कुलकर्णी, आयएम अभिषेक केळकर, आयएम चंद्रशेखर गोखले यांसह डब्लूआयएम सलोनी सापळे हे आंतरराष्ट्रीय मास्टर्स झुंजनार आहेत. ही स्पर्धा पीवायसी बुद्धिबळ अकादमी, पीवायसी हिंदू जिमखाना येथे दि.1 ते 3 फेब्रुवारी 2020 या कालावधीत होणार आहे.
बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, स्पर्धेला बुद्धिबळ क्रीडा ट्रस्ट यांचे प्रायोजकत्व लाभले असून यांच्या वतीने विजेत्यांना 2020 मध्ये दुबई अथवा आबुदाभी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी एअर तिकीट आणि इतर खर्च करण्यात येणार आहे.
सस्पर्धेत राज्यांतील 40 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये 21 खेळाडू हे 2000रेटिंग असलेले आणि त्यावरील रेटिंग असलेल्या खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला आहे. तसेच, ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने 7 फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत एकूण 80000 रुपयांची पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये विजेत्याला 30000रुपये, उपविजेत्याला 20000रुपये, तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला 15000रुपये, चौथ्या क्रमांकाच्या खेळाडूला 10000रुपये आणि पाचव्या क्रमांकाच्या खेळाडूला 5000रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याचे कुंटे यांनी नमूद केले.