पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित अरुण साने मेमोरियल हौशी टेनिस लीग स्पर्धेत पीवायसी अ, एमडब्लूटीए, एमडब्लूटीए एसपी कॉलेज आणि लॉ कॉलेज लायन्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत अमित नाटेकर, सारंग देवी, सारंग पाबळकर, मिहीर दिवेकर, अमित लाटे, योगेश पंतसचिव यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर पीवायसी अ संघाने बालेवाडी टेनिस ग्रुप संघाचा 18-06 असा पराभव केला. लॉ कॉलेज लायन्स संघाने आरपीटीए गोगेटर्सचा 16-10 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. विजयी संघाकडून तारख पारीख, राहुल पंढरपुरे, अभिजित मराठे, शिवाजी यादव यांनी सुरेख कामगिरी बजावली.
अन्य लढतीत एमडब्लूटीए संघाने ओडीएमटी अ संघाचा 18-09 असा तर, एमडब्लूटीए एसपी कॉलेज संघाने मॉँट व्हर्ट प्रीस्टाईनचा 18-03 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
पीवायसी अ वि.वि.बालेवाडी टेनिस ग्रुप 18-06(80अधिक गट: अमित नाटेकर/सारंग देवी वि.वि.नरेंद्र सोपल/मनू नांजेगौडा 6-2; खुला गट: सारंग पाबळकर/मिहीर दिवेकर वि.वि.जॉर्ज वरघसे/सचिन भास्करण 6-1; खुला गट: अमित लाटे/योगेश पंतसचिव वि.वि.विक्रांत सुर्वे/केतन गद्रे 6-3);
लॉ कॉलेज लायन्स वि.वि.आरपीटीए गोगेटर्स 16-10(80अधिक गट: तारख पारीख/राहुल पंढरपुरे वि.वि.वसंत साठे/यशराज 6-0; खुला गट: अभिजित मराठे/शिवाजी यादव वि.वि.संदीप आगटे/सचिन लाखे 6-4; खुला गट: मानस कारकर/केतन जाठर पराभूत वि.शिव जावडेकर/अमोल गायकवाड 4-6);
एमडब्लूटीए वि.वि.ओडीएमटी अ 18-09(80अधिक गट: जयदीप वाकणकर/निलेश ओस्तवाल वि.वि.अतुल मांडवकर/चंदन निगुडकर 6-3; खुला गट:विवेक खडगे/आशिष मणियार वि.वि.इंद्रनील चक्रबोर्ती/हिमांशू कपाडिया 6-5(3);खुला गट: अभिषेक चव्हाण/सुनील लुल्ला वि.वि.करण कुमार/कौस्तुभ देशमुख 6-1);
एमडब्लूटीए एसपी कॉलेज वि.वि.मॉँट व्हर्ट प्रीस्टाईन 18-03(80अधिक गट: उमेश भिडे/मिलिंद घैसास वि.वि.गिरीश कुकरेजा/धर्मेश वाधवानी 6-1; खुला गट: स्वेतल शहा/मंदार मेहेंदळे वि.वि.अमित तलरेजा/मनोज सेठिया 6-0; खुला गट: गजानन कुलकर्णी/आदित्य जोशी वि.वि.सुधाकर आर/संजीव माधव 6-2).