16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019-20 स्पर्धेत सनगार्ड एएस संघांचा सलग दुसरा विजय

Date:

पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 16व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2019- 20 स्पर्धेत साखळी फेरीत एलटीआय,  गालघर ,सनगार्ड एएस व झेंन्सर या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 
 
व्हिजन क्रिकेट मैदान येथे  झालेल्या सामन्यात साखळी फेरीत कौस्तुभ बकरेच्या 69 धावांच्या बळावर सनगार्ड एएस संघाने दसॉल्ट सिस्टिम्स संघाचा 1 गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना दसॉल्ट सिस्टिम्स संघाने 20 षटकात 8 बाद 148 धावा केल्या. 148 धावांचे लक्ष कौस्तुभ बकरेच्या 69 व   पार्थ शर्माच्या 21 धावांसह सनगार्ड एएस संघाने 19.3 षटकात 9 बाद 152 धावा करून पुर्ण केले.  कौस्तुभ बकरे सामनावीर ठरला.
 
दुस-या लढतीत मयंक वैदच्या नाबाद 44 धावांच्या जोरावर एलटीआय संघाने ग्लोबाकॉम संघाचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना राहुल कृष्णनच्या 37 व अकबर अली खानच्या 35 धावांसह ग्लोबाकॉम संघाने 20 षटकात सर्वबाद 133 धावा केल्या. 133 धावांचे लक्ष सुमित पांडाच्या 41 ,  आयुष अवस्थीच्या नाबाद  34व मयंक वैदच्या नाबाद 44 धावांसह एलटीआय संघाने केवळ 13.5 षटकात 3 बाद 138 धावा करून सहज पुर्ण करत सामना जिंकला. मयंक वैद सामनावीर ठरला.
 
पीवायसी हिंदू जिमखाना मैदानावर झालेल्या  लढतीत  शुबेंदू पांडेच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर  गालघर संघाने पबमॅटीक संघाचा 7 गडी राखून पराभव केला. शुबेंदूने 28 धावात 3 गडी बाद व 51 चेंडूत नाबाद 85 धावा केल्या.  अकिब पिरझादेच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर  झेंन्सर संघाने हर्मन संघाचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.  
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
दसॉल्ट सिस्टिम्स- 20 षटकात 8 बाद 148 धावा(अभिषेक वर्मा 27 (21), मंदार जोशी 21 (18), पियुष इंगळे 39 (30), सचिन पाटील 32 (16), अश्विन गोरेल 2/32) पराभूत वि सनगार्ड एएस- 19.3 षटकात 9 बाद 152 धावा(पार्थ शर्मा 21 (12), कौस्तुभ बकरे 69 (55), विकास कुमार 2/25 , सचिन पाटील 2/33 , पियुष इंगळे 2/33) सामनावीर- कौस्तुभ बकरे
सनगार्ड एएस संघाने 1 गडी राखून सामना जिंकला.
 
ग्लोबाकॉम- 20 षटकात सर्वबाद 133 धावा(राहुल कृष्णन 37 (39), अकबर अली खान 35 (28), शुभम शर्मा 3/22 , दिपक मिश्रा  2/30) पराभूत वि एलटीआय- 13.5 षटकात 3 बाद 138 धावा(सुमित पांडा 41 (14), आयुष अवस्थी नाबाद  34 (29), मयंक वैद नाबाद 44 (26), हरिष कल्लादथील  2/26) सामनावीर- मयंक वैद
एलटीआय संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
 
पबमॅटीक- 20 षटकात 9 बाद 165 धावा(सुमित जुई 32 (31), तुषार शिरोडकर 24 (19), अमित जोशी नाबाद 69  (37), शुबेंदू पांडे 3/28, गौरव बाजपई 5/22) पराभूत वि गालघर- 17 षटकात 3 बाद 166 धावा(शुबेंदू पांडे नाबाद 85 (51), श्रिकांत सोमवंशी 58 (37), सोनल सौरभ 2/23) सामनावीर- शुबेंदू पांडे
गालघर संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
हर्मन- 20 षटकात 7 बाद 123 धावा(नितिन नारळे 36 (44), निशांत खंडागळे नाबाद  34 (27), अकिब पिरझादे 3/19, अनिल त्रिपाठी 2/17) पराभूत वि झेंन्सर- 16 षटकात 5 बाद 124 धावा(ऋषिकेश राऊत नाबाद 45 (42), सिध्दार्थ जालन 35 (19), अभिषेक धनावडे 3/33) सामनावीर- अकिब पिरझादे
झेंन्सर संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.       
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...