एमसीए संयुक्त जिल्हा संघाचे पूना क्लब संघापुढे 509 धावांचे आव्हान

Date:

पुणे:  पीवायसी हिंदू  जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत पहिल्या दिवशी मुर्तझा ट्रँकवाला(233धावा)च्या द्विशतकी खेळीसह  आतिश वरपे 102धावा)याच्या शतकी खेळीच्या जोरावर एमसीए संयुक्त जिल्हा संघाने पहिल्या डावात पूना क्लब संघापुढे 509 धावांचा डोंगर उभा केला आहे. तर, दुसऱ्या सामन्यात  वैभव गोसावी(23-5) याने केलेल्या अफलातून गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघ पहिल्या डावात  107 धावांवर संपुष्ठात आला.

पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावरील तीन दिवसीय लढतीत आज पहिल्या दिवशी एमसीए संयुक्त जिल्हा संघाने प्रथम फलंदाजी करताना 88षटकात 6 बाद 509धावा केल्या. यात मुर्तझा ट्रँकवाला याने धडाकेबाज फलंदाजी करत 167 चेंडूत 20चौकार व 16 षटकरांच्या मदतीने 233 धावा केल्या, तर आतिश वरपे याने मुर्तझाला सुरेख साथ देत 149चेंडूत 13चौकारांसह 102 धावा केल्या. मुर्तझा ट्रँकवाला व  आतिश वरपे यांनी चौथ्या गड्यासाठी 193चेंडूत 197धावांची भागीदारी करून संघाला भक्कम अशी सुरुवात करून दिली.  मुर्तझा बाद झाल्यानंतर आतिशने  तरणजित सिंग दिलोन( 46धावा)च्या साथीत 70चेंडूत 83 धावांची भागीदारी करून संघाला  509 धावांचे आव्हान उभे करून दिले. पूना क्लबकडून  राजकमल चौहान 20-97-2, अजिंक्य नाईक 5-38-2)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.  एमसीए संयुक्त जिल्हा संघ व पूना क्लब यांच्यातील सामन्याचा अजून दोन दिवसांचा खेळ बाकी आहे. 
 
नेहरू स्टेडियम मैदानावरील सामन्यात क्लब ऑफ महाराष्ट्रच्या वैभव गोसावी(23-5), निकित धुमाळ(49-3)यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघाचा पहिला डाव 36.3षटकात 107धावावर संपुष्टात आला. यात सुहेल श्रीखंडे 31, आत्मन पोरे 26यांनी धावा केल्या. याच्या उत्तरात क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने आज दिवसअखेर 37षटकात 6बाद 85धावा केल्या. यामध्ये राजवर्धन उंडरे 28, सुजित उबाळे नाबाद 24धावा, तर संकेत चव्हाण 1 धावसंख्येवर खेळत आहे. डेक्कन जिमखाना व  क्लब ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सामन्याचा अजून दोन दिवसाचा खेळ बाकी आहे. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: 
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदान: पहिला डाव: एमसीए संयुक्त जिल्हा संघ: 88षटकात 6 बाद 509धावा(मुर्तझा ट्रँकवाला 233(167,20×4,16×6), आतिश वरपे 102(149,13×4), तरणजित सिंग दिलोन 46(38,3×4,4×6), विजय झोल 42, राजकमल चौहान 20-97-2, अजिंक्य नाईक 5-38-2) वि.पूना क्लब:.    
 
नेहरू स्टेडियम क्रिकेट मैदान: पहिला डाव:  डेक्कन जिमखाना: 36.3षटकात सर्वबाद 107धावा(सुहेल श्रीखंडे 31(56,6×4), आत्मन पोरे 26(37,3×4), वैभव गोसावी 9-23-5, निकित धुमाळ 13-49-3, सुजित उबाळे 9.3-18-2) वि.क्लब ऑफ महाराष्ट्र: 37षटकात 6बाद 85धावा(राजवर्धन उंडरे 28, सुजित उबाळे नाबाद 24(43,2×4), देवदत्त नातू 10, आशय पालकर 11-14-3, पियुष साळवी 5-5-1, धीरज फतंगरे 11-29-1);  
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बाप- लेकीच्या नात्याची‘द्विधा’

बाप आणि लेक हे नातं शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. आईच्या कुशीत माया तर वडिलांच्या सावलीत सुरक्षिततेचा आधार असतो. आपल्या लेकीच्या आनंदासाठी झटणारा बाप आणि संकटात वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी लेक, हे नात्याचं सर्वात सुंदर रूप असतं. ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटातही बाप-लेकीच्या नात्यातील प्रेम, त्याग आणि भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार व हृदयस्पर्शी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. ‘फादर्स डे’चं औचित्य साधत ‘द्विधा’ चित्रपटाचे भावस्पर्शी पोस्टर आणि टिझर प्रदर्शित करण्यात  आला असून येत्या २१ ऑगस्टला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांचे आहे. निर्माती विदुला रमेश आजगावकर आहेत.  नात्यांमधली ‘द्विधा’ ही फक्त निर्णयांची नव्हे, तर भावनांचीही लढाई असते. विश्वास आणि अपेक्षा यांच्या मधोमध उभं राहिलेलं मन कधी स्वतःसाठी, तर कधी समोरच्यांसाठी झुकतं. ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्या प्रभावी भूमिकांतून ‘द्विधा’ बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या दोघांसोबत रेणूका दफ्तरदार, निमिष कुलकर्णी, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर, ओवी तानवडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘द्विधा’ हा केवळ बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात येणाऱ्या भावनिक संघर्षाची कहाणी आहे. आयुष्यात एखादी वेळच अशी येते की, मन ‘द्विधा’ अवस्थेत अडकतं. ही भावना अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रदर्शित झालेला हा टिझर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल, असा विश्वास दिग्दर्शक निलेश नाईक यांनी व्यक्त केला. ‘द्विधा’ चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संकलन निलेश नाईक यांनी केले आहे. चित्रपटातील गीते गीतकार मंगेश कांगणे, मंदार चोळकर यांची असून संगीताची जबाबदारी निलोत्पल बोरा आणि शैलेंद्र बर्वेयांनी सांभाळली आहे. निलोत्पल बोरा यांनी नेटफ्लिक्ससाठी अनेक लोकप्रिय वेब सिरीज आणि प्रकल्पांवर काम केले आहे. हंसिका परीक, मयुरी पटवर्धन यांचा स्वरसाज गाण्यांना लाभला आहे. छायांकन सिमरजीत सुमन, अश्विनी पाखरोट,श्रीधर अल्ले यांचे आहे  वेशभूषा विदुला आजगावकर यांची आहे. ध्वनीरचना इक्रामुद्दीन रुस्तम लोचूर तर ध्वनीमिश्रण योगेश कारभारी नेहे, आकाश स्वजन सेनगुप्ता यांनी केले आहे.

फुरसुंगीत स्टील व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; बिश्नोई गँगच्या कनेक्शनची चर्चा

पुणे-पुण्यात खंडणीसाठी एका व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना...

इतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज : प्र. के. घाणेकर

वनराई आणि इतिहास प्रबोधन समितीच्या संयुक्त उपक्रमात ‘इतिहासातील पर्यावरण’...