एमएसआरए 76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत वीर चॊत्रानी, सुनीता पटेल यांनी उदघाटनाचा दिवस गाजवला  

Date:

पुणे: महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटना(एमएसआरए) यांच्या तर्फे आयोजित व स्क्वॅश रॅकेटस्‌ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसआरए-76व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॅश 2019 अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या सुनीता पटेल हिने तर, पुरुष गटात वीर चॊत्रानी या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.

अमनोरा मॉल ग्लास कोर्ट, आयस्क्वॅश अकादमी, चंचला संदीप कोदरे स्पोर्टस्‌ क्लब, मुंढवा, आणि आरएसआय येथील स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत पुरुष गटात महाराष्ट्राच्या वीर चॊत्रानी याने महाराष्ट्राच्या अकराव्या मानांकित ऐश्वर्य सिंगचा 9-11, 11-5, 10-12, 11-3,11-3 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.

महिला गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या बिगरमानांकीत सुनीता पटेल हिने पाचव्या मानांकित मध्यप्रदेशच्या राधिका राठोरचा 11-5,12-10, 9-11, 11-4 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. सहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या सानिका चौधरी हिने आपलीच राज्य सहकारी दिया मुलाणीचा 13-11,11-6, 11-2 असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या चौथ्या मानांकित तन्वी खन्नाने महाराष्ट्राच्या योश्ना सिंगला 11-9, 11-3, 12-10 असे पराभूत करून आगेकूच केली.

पुरुष 45वर्षावरील गटात पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या विनय रौथन,आशुतोष पेडणेकर, कर्नाटकाच्या अनुप कबडवाल, नवीन शेनॉय यांनी तर, प्रो कोच गटात महाराष्ट्राच्या महेश कदम, जयनेंद्र भंडारी, सर्व्हिसेसच्या जय सिंग थोरी,  उत्तरप्रदेशच्या शादाब आलम,राजस्थानच्या विकास जांगरा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचे उदघाटन संयोजन समितीचे अध्यक्ष व पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट, कैलाश कोद्रे, जहांगीर हॉस्पिटलचे सर कावसजी जहांगीर आणि लेडी जास्मिन जहांगीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसआरएचे अध्यक्ष डॉ.प्रदीप खांड्रे, सचिव डॉ. ए. दयानंद कुमार, पीडीएसएचे अध्यक्ष कालिदास मगर, सचिव आनंद लाहोटी, पवन राऊत, गणेश तांबे, आनंद सुरोडकर, ज्ञानेश भावसार, डॉ. संदीप जगताप, डॉ. आकाश शहा, मरीशा जिल्का आणि आसिफ सय्यद आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष गट: पहिली फेरी(मुख्य ड्रॉ):
गौरव नंदराजोग(दिल्ली)[5] वि.वि.यश भार्गवा(दिल्ली)[10]11-7, 5-11, 11-8, 11-1;
वीर चॊत्रानी(महाराष्ट्र)वि.वि.ऐश्वर्य सिंग(महाराष्ट्र)[11]9-11, 11-5, 10-12, 11-3,   11-3
संदीप जांगरा(सर्व्हिसेस)[15] वि.वि.विजय कुमार(सर्व्हिसेस)[4]11-3, 4-0सामना सोडून दिला;
अभिषेक अगरवाल(महाराष्ट्र)[3]वि.वि.रवी दिक्षित(सर्व्हिसेस)[41] 12-10, 11-7, 4-11, 11-9
रणजित सिंग(सर्व्हिसेस)[6] वि.वि.राहुल बैठा(महाराष्ट्र)[13]  11-8, 11-3, 11-6
जमाल साकिब(सर्व्हिसेस)[7]वि.वि. अवदेश यादव(सर्व्हिसेस)[25] 11-5,13-11,11-5

महिला गट:पहिली फेरी(मुख्य ड्रॉ):
सानिका चौधरी(महाराष्ट्र)[6]वि.वि.दिया मुलाणी(महाराष्ट्र)13-11,11-6, 11-2;
सुनीता पटेल(महाराष्ट्र)वि.वि.राधिका राठोर(मध्यप्रदेश)[5]11-5,12-10, 9-11, 11-4;
तन्वी खन्ना(दिल्ली)[4]वि.वि.योश्ना सिंग(महाराष्ट्र)11-9, 11-3, 12-10;
अंजली सेमवाल(महाराष्ट्र)वि.वि.सुनयना कुरुविला(तामिळनाडू)[3]
अपरजिथा बालमुरुकन(तामिळनाडू)[7] वि.वि.अन्वेषा रेड्डी(तामिळनाडू)
सान्या वत्स(दिल्ली)[8]वि.वि.ऐश्वर्या खुबचंदानी(महाराष्ट्र)[16]11-4, 11-1, 4-11, 11-9;

पुरुष 45वर्षावरील गट: पहिली फेरी:
अनुप कबडवाल(कर्नाटक)वि.वि.विराज मडकवी(महाराष्ट्र)11-8, 12-14, 11-2, 11-3;
विनय रौथन(महाराष्ट्र)वि.वि.विजय सोनावणे(महाराष्ट्र)11-9, 11-6, 11-6;
आशुतोष पेडणेकर(महाराष्ट्र)वि.वि.शिशिर गुप्ता(महाराष्ट्र)11-7, 11-2, 11-4;
नवीन शेनॉय(कर्नाटक)वि.वि.आशिष मेहता(महाराष्ट्र)11-9, 8-11, 5-11, 16-14, 11-9;

प्रो कोच: पहिली फेरी:
महेश कदम(महाराष्ट्र)वि.वि.अभिषेक गमरे(महाराष्ट्र)8-11, 11-3, 10-12, 11-7, 11-7;
शादाब आलम(उत्तरप्रदेश)वि.वि.नरेश बानोधा(मध्यप्रदेश)12-10, 11-2, 12-10;
विकास जांगरा(राजस्थान)वि.वि.आकाश बानोधा(मध्यप्रदेश)11-3, 11-5, 9-11, 11-7;
जय सिंग थोरी(सर्व्हिसेस)वि.वि.साईराज मरावर(महाराष्ट्र)11-7, 11-6, 5-11, 10-12, 11-3;
जयनेंद्र भंडारी(महाराष्ट्र)वि.वि.तथागत मल्हारे(महाराष्ट्र)11-7, 11-3, 11-6;

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...